धुळे जिल्ह्यात आॅनलाईन खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकºयांकडून प्रतिसाद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:32 PM2017-10-28T12:32:13+5:302017-10-28T12:33:46+5:30
२५ दिवसात केवळ ३० शेतकºयांनीच केली नोंदणी, प्रक्रिया किचकट असल्याचे शेतकºयांचे म्हणणे
आॅनलाईन लोकमत
धुळे : शासन निर्णयानुसार शेतीमालाची हमी भावाने खरेदी सुरू झालेली आहे. यावर्षापासून मूग, उडीद, सोयाबीनची आॅनलाईन पद्धतीने खरेदी सुरू झालेली आहे. यासाठी नोंदणी आवश्यक आहे. मात्र धुळे जिल्ह्यात शेतकºयांकडून नोंदणीला आजपर्यंत प्रतिसादच मिळाला नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळालेली आहे.
पूर्वी उडीद, मूग, आणि सोयाबीनची खरेदी हमी भाव न देताच केली जात होती. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. मात्र २०१७-१८ या खरीप हंगामासाठी शेतकºयांचा माल हा हमीभावाने खरेदी केला जाणार आहे.
केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार ३ आॅक्टोबर ते १३ डिसेंबर १७ या कालावधित मूग, उडीद, व सोयाबीनची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.
मुगासाठी ५ हजार ५७५ रुपये, उडीदसाठी ५ हजार ४०० रुपये, तर सोयाबीनसाठी ३ हजार ५० रुपये हमीभाव देण्यात आलेला आहे. हमीभावामुळे शेतकºयांचे हाल थांबण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात खरेदी-विक्री संघामार्फत ही खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्यात तीन केंद्रावर नोंदणी, खरेदी सुरू झालेली आहे.
शेतकºयांकडून प्रतिसादच नाही
मूग, उडीद, सोयाबीनची आॅनलाईन खरेदी प्रक्रिया सुरू झालेली असली तरी शेतकºयांकडून अद्याप त्याला प्रतिसादच मिळालेला नाही. जिल्ह्यात फक्त शिरपूर येथील खरेदी विक्री केंद्रावर मुगासाठी २८ व सोयाबीन, उडीदसाठी फक्त १-१ शेतकºयाने नोंदणी केलेली आहे. उर्वरित दोघ केंद्रांवर गेल्या २५ दिवसात नोंदणीच केलेली नाही.
नोंदणी आवश्यकच
हमीभावाने माल विक्रीसाठी शेतकºयांनी आॅनलाईन खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी ७/१२ उताºयाची मूळप्रत, आधारकार्ड, बॅँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच आधारभूत दराने खरेदी होईल. शेतकºयांना मोबाईल मॅसेजद्वारे माल खरेदीबाबत कळविण्यात येणार आहे.
शुभारंभाच्या दिवशी एकाच शेतकºयाने कापूस आणला
कापूस फेडरेशनमार्फत धुळे कृउबात गुरूवारपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली. यात ब्रह्मा या वाणाच्या कपाशीला ४३२०, एच४एच६ वाणाच्या कपाशीला ४२२०, तर एलआर ५१ या वाणाच्या कपाशीला ४१२० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला. मात्र खरेदीच्या पहिल्या दिवशी फक्त एकाच शेतकºयांने कापूस विक्रीसाठी आणला होता. कापूस खरेदी केंद्रावरही नोंदणी करणे गरजेचे असून, त्यासाठी ७/१२ उतारा, आधारकार्ड, बॅँक खात्याच्या पासबुकाची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक देणे गरजेचे आहे.
शेतकºयांनी लाभ घ्यावा
आॅनलाईन खरेदी प्रक्रिया पारदर्शक आहे. शेतकºयांनी याचा लाभ घ्यावा. तसेच ७/१२ उतारा, आधारकार्ड, बॅँक पासबुकाची झेरॉक्स नेऊन, केंद्रावर नोंदणी करावी, असे धुळे सहकारी संस्थेच्या सहायक निबंधक राखी मंगेश गावड यांनी सांगितले.