देशात सरसकट मंदीचे सावट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 11:40 AM2019-10-04T11:40:01+5:302019-10-04T11:40:23+5:30
साक्री येथील व्याख्यानमालेत प्रा.प्रकाश पाठक यांचे प्रतिपादन
आॅनलाइन लोकमत
साक्री (जि.धुळे) : अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी सरकार अनेक पाऊले उचलत आहे़ त्याचा काही अंशी परिणाम सध्या अर्थव्यवस्थेवर होत आहे़ त्यामुळे एक-दोन क्षेत्रातील घट म्हणजे सरसकट अर्थव्यवस्थेची मंदीची लाट म्हणता येवू शकत नाही. असे मत जेष्ठ विचारवंत प्रा.प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले.
साक्री येथील श्री. छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या १९ व्या शारदोत्सव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी या विषयावर प्रा. पाठक बोलत होते.
अध्यक्षस्थानी साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अॅड. गजेंद्र भोसले होते़ तर कार्यवाह प्रा. व्ही. के. शहा, प्रा. डी. एन. खैरनार, आबा सोनवणे, प्रा. एल. जी.सोनवणे, सांस्कृतिक समिती प्रमुख विजय भोसले, संचालक आबा सोनवणे, आर. डी. भामरे, अजीज खा पठाण, पी. झेड. कुवर उपस्थित होते.
प्रा. पाठक पुढे म्हणाले की, सध्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात घसरण होत असली तरी स्थिती लवकरच सुधारेल. अर्थ व्यवस्थेचे विविध निर्देशांक गेल्या काही वर्षांमध्ये स्थिरावले आहेत़ मात्र अर्थव्यवस्थेतील काही कीडमुळे सध्याच्या घसरणीची स्थिती दिसून येते. यात काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय घडामोडी देखील कारणीभूत आहे असे मतत्यांनी मांडले. देशात सरसकट मंदिचे वातावरण नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त प्रा़ बी. पी. निकम यांना पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.