वर्गणीच्या वादातून शहाद्यात दोन गट भिडले
By admin | Published: April 4, 2017 12:55 AM2017-04-04T00:55:10+5:302017-04-04T00:55:10+5:30
तुंबळ हाणामारी : फायटरचा वापर करून केले जखमी
नंदुरबार : शहादा येथे डॉ़ बाबासाहेब जयंतीनिमित्त होणारे कार्यक्रम आयोजित करणे आणि वर्गणी गोळा करण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ हाणामारीदरम्यान दोन्ही गटांनी हातातील फायटर या हत्याराचा वापर करत एकमेकांना जखमी केल्याची माहिती आह़े
शहाद्यातील तलाठी कॉलनीत प्रशांत दौलत मोरे याने रविवारी सायंकाळच्या सुमारास बाजार चौकात धनराज दादाभाई ईशी यास जयंती कार्यक्रमांबाबत विचारणा केली, याचा राग येऊन धनराज ईशी, दीपक नाना निकुंभ, चेतन मोलचंद तिरमुले, संदीप बि:हाडे, पिरन नामदेव मोरे सर्व रा़ आंबेडकर चौक, शहादा यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली़ यादरम्यान दुस:या गटातील विकी दौलत मोरे, लकी दौलत मोरे, जाकी दौलत मोरे, जितू संभाजी शिरसाठ, अनिल वंजी खैरनार यांनीही विरोधी गटातील सदस्य पिरन मोरे, संदीप बि:हाडे, चेतन तिरमुले व धनराज ईशी यांना मारहाण केली़ भरबाजारात रविवारी सायंकाळी झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली होती़
या घटनेनंतर रविवारी रात्री उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होत़े प्रशांत मोरे व धनराज ईशी यांनी एकमेकांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील सदस्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आह़े या मारहाणीदरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांना हातातील फायटरच्या साहाय्याने मारहाण केल्याने काही जण जखमी झाल्याची माहिती आह़े (वार्ताहर)