महासभेत झाला दांगडो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:29 PM2019-12-31T22:29:06+5:302019-12-31T22:29:36+5:30

सीएए कायदा : समर्थन व विरोधावरुन झाला वाद

 There was a riot in the General Assembly! | महासभेत झाला दांगडो !

Dhule

Next

धुळे : केंद्र सरकारने पारीत केलेल्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ भाजपाच्या नगरसेवकांनी महासभेत अभिनंदनाचा ठराव करण्याची मागणी केली़ यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दीक वाद झाला़
महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात मंगळवारी महासभा घेण्यात आली़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, उपायुक्त कल्याणी अंपळकर, आयुक्त अजिज शेख, नगरसचिव मनोज वाघ आदीसह नगरसेवक उपस्थित होते़ सभेत केद्र सरकार पारीत केलेला कायद्याचे समर्थन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदन करण्याचा ठराव करावा अशी मागणी सदस्यांनी केली़ यावेळी मुस्लिम विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदवित कायद्याला विरोध केल्याने सभेत शाब्दीक वाद झाला होतो़ त्यावेळी नगरसेवक गवळी यांनी कायद्याविषयी माहिती दिली़ तर विरोधीपक्षनेते साबीर शेख, समाजवादी, एमआय एमच्या नगरसेवकांनी महापौरांना निवेदन दिले़ - हॅलो पान ३ वर

Web Title:  There was a riot in the General Assembly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे