धुळे शहर हद्दवाढीत दुपटीपेक्षा अधिक क्षेत्र वाढणार
By admin | Published: May 28, 2017 04:17 PM2017-05-28T16:17:05+5:302017-05-28T16:17:05+5:30
सध्याच्या क्षेत्रफळात 62़51 चौरस वर्ग किमी क्षेत्राचा समावेश प्रस्तावित
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.28-शहर हद्दवाढीचा अंतिम प्रस्तावानुसार शहराच्या सध्याच्या क्षेत्रफळात 11 गावातील 62़51 चौरस वर्ग किमी क्षेत्राचा समावेश करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आह़े
सध्या धुळे शहराचे क्षेत्रफळ 46़46 चौरस वर्ग किमी असून हद्दवाढीत 62़51 चौरस वर्ग किमी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आह़े त्यामुळे प्रस्तावित क्षेत्रात शासनाकडून बदल न झाल्यास धुळे शहराचे एकूण क्षेत्रफळ दुपटीपेक्षा अधिक अर्थात 108़97 चौरस वर्ग किमी होणार आह़े
सुधारित प्रस्ताव सादर
शहर हद्दवाढीबाबत यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी ए़ बी़ मिसाळ यांनी महिंदळे, भोकर, नकाणे आणि वलवाडी ही चार गावे पूर्णत: व 12 गावांचा अंशत: समावेश करावा असा अभिप्राय देऊन प्रस्ताव शासनाला सादर केला होता़ त्याबाबत गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली होती़ या बैठकीत आमदार अनिल गोटे यांनी हद्दवाढीच्या प्रस्तावित क्षेत्रात वाढ करण्याची मागणी केली होती़ त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित गावांमधील एनए क्षेत्राचा समावेश करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होत़े त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीस शहर हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर झाला आह़े
पाच गावे वगळली!
शासनाला पूर्वी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात 16 गावे समाविष्ट होती़ मात्र, आता 16 गावांपैकी वडजाई, लळींग, कुंडाणे, बिलाडी, फागणे ही पाच गावे वगळण्यात आली आहेत. शासनाने मनपा प्रशासनाकडून हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आलेल्या क्षेत्राचे सुधारित नकाशे व अनुषंगिक कागदपत्रांची मागणी केली होती़ त्यानुसार मनपाने शासनाला माहिती सादर केली असून येत्या काही दिवसांतच हद्दवाढीची अधिसूचना प्रसिद्ध होऊन हद्दवाढ लागू होण्याची शक्यता आह़े
मनपा, जि़प़त विरोधाचा ठराव
शहर हद्दवाढीस विरोध करीत महापालिकेनेच 7 सप्टेबर 2015 ला हद्दवाढीच्या विरोधात ठराव केला होता़ तत्पूर्वी जिल्हा परिषद व हद्दवाढीत त्यावेळी समाविष्ट असलेल्या 16 गावांपैकी 12 गावातील ग्रामपंचायतींनी देखील 15 ऑगस्ट 2015 ला घेण्यात आलेल्या ग्रामसभेत हद्दवाढीला विरोधाचा ठराव करून हरकती दाखल केल्या़ त्यामुळे तब्बल 150 हरकती शहर हद्दवाढीवर दाखल झाल्या होत्या व त्यावर सुनावणी देखील झाली होती़ मात्र शासनाने ठोस भुमिका घेत हद्दवाढ करणार असल्याचे स्पष्ट केले होत़े