भाजपात कधीही खिंडार पडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 03:10 PM2020-11-01T15:10:14+5:302020-11-01T15:10:59+5:30
ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील
चंद्रकांत सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
भाजप देशातील मोठा पक्ष आहे. आमच्या पक्षात घराणेशाही नसल्याने चहावाला पंतप्रधान होऊ शकतो. तर एक दलित व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी निवड जातो. आमच्याकडे देश प्रथम, पक्ष द्वितीय तर व्यक्तीला तिसरे स्थान आहे २ खासदार वरून ३०३ खासदार अशी या पक्षाची वाटचाल आहे. यात अनेकांचे योगदान आहे. नाथाभाऊ आमचे जेष्ठ नेते होते पण त्यांनी पक्षातर केल्याने आता फक्त आमचे संबंध राहतील मात्र पक्षीय बाब आडवी आली तर आम्ही खंबीरपणे भाजपच्या पाठीशी उभे असू यात शंका नाही असे मत लोकमत शी बोलतांना भाजपाचे शिंदखेडा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले.
प्रश्न : माजी मंत्री खडसे यांच्या पक्षांतराने काय फरक पडू शकतो?
उत्तर : भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे, माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपाचे जेष्ठ नेते होते. पक्ष वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान जरी असले तरी आता प्रत्येक कार्यकर्ता हुशार झाला आहे. त्याला कोणता पक्ष चांगला, कोणता वाईट याची पुर्णपणे जाणीव आहे. म्हणून नाथाभाऊंच्या जाण्याचे काही परीणाम होणार नाही.
प्रश्न : भाजपातील मतभेद व स्थानिक संस्था हातातून जावू नये, यासाठी काय प्रयत्न केले जाणार?
उत्तर : जिल्ह्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचे वर्चस्व आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराचा फारसा फरक पडेल असे तरी वाटत नाहीत. नाथाभाऊ यांच्या विषयी आदर राहील. शिंदखेडा तालुका भाजपात कधीही मतभेद वगैरे नाहीत, आणि जर निर्माण झाले तर ते एकत्र येवून सोडविले जाईल.
पक्षांच्या संघटनेत काही बदल होण्याची शक्यता आहे का?
उत्तर : यापुवी पदाधिकार्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. त्यामुळे नविन बदल करण्याचा विषय येत नाही. पदाधिकारी कार्यकते प्रामाणिक आहेत. व एकनिष्ठ आहेत. त्यामुळे कितीही तांडव केला तरी कोणी कुठे जाणारा नाही.
त्या नेत्याचा जिल्ह्यावर काही प्रभाव पडणार नाही...
त्यांना त्यांच्या पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे, आम्ही आमच्या पक्ष बळकट करण्यासाठी कार्य करू, माजी मंत्री खडसे यांच्या सोबत जळगाव जिल्हातील काही पदाधिकारी सोबत येतील, अशी चर्चा आहे. मात्र त्या नेत्याचा आमच्या जिल्ह्यावर काहीही पडणारा नाही. हे मात्र निश्चित
भाजपाचे आता साक्री न.पा.कडे लक्ष....
महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद तसेच जिल्हा परीषदेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. आता आगामी काळात साक्री नगरपालिका निवडणूका आहे. या निवडणूकीसाठी भाजपाकडून सर्वातोपरी प्रयत्न केले जातील.
केवळ प्रसिध्दीसाठी...
भाजपाचे नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा, केवळ प्रसिध्दीसाठी केलेला प्रयत्न आहे. कोणाच्या सांगण्यावर कोणी जात नाही. किंवा पक्ष ही लहान होत नाही.