लहान मुलाच्या माध्यमातून चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 06:59 PM2021-05-22T18:59:47+5:302021-05-22T18:59:58+5:30

एलसीबीची कारवाई : ८९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Thief caught by police through a child | लहान मुलाच्या माध्यमातून चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

लहान मुलाच्या माध्यमातून चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Next

धुळे : हॉटेलमध्ये बसलेल्या एका मुलाजवळ पोते असून त्यात चोरीच्या वस्तू असल्याची माहिती मिळताच सापळा लावून त्याला पकडले़ पोलिसी खाक्या दाखविताच त्याने साथीदारासोबत चोरी केल्याची कबुली दिली़ त्या साथीदाराच्याही मुसक्या आवळण्यातस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले़ त्यांच्याकडून ८९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ दरम्यान, विधी संघर्षित बालकाला बाल सुधार गृहात पाठविण्यात आले आहे़
शहरातील मच्छीबाजार चौकातील मोहम्मदीया हॉटेलमध्ये एक विधी संघर्षित बालक बसलेला असून त्याच्याजवळ एक पोते आहे़ त्याच्यात चोरीच्या वस्तू असल्याचा संशय आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली़ माहिती मिळताच त्या हॉटेलच्या परिसरात सापळा लावण्यात आला़ त्या बालकाला ताब्यात घेण्यात आले़ त्याची चौकशी आणि पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव सांगितले़ लागलीच पथकाने मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी (२२, रा़ ८० फुटी रोड, नटराज टॉकीजजवळ, धुळे) याला अटक करण्यात आली़ त्या दोघांनी मिळून नकाणे गाव आणि बिलाडी रोड भागात चोरी करुन या तांब्या-पितळाची भांडी, सोन्या-चांदीचे दागिने चोरुन आणल्याचे सांगितले़ त्यांच्याजवळून ५५ हजार २१० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, ३ हजार ६५० रुपये किंमतीचे तांबे पितळाची भांडे, ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण ८८ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ दोन ठिकाणी केलेल्या चोरीची नोंद पोलीस ठाण्यात आहे़
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी, कर्मचारी रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदिप थोरात, प्रकाश सोनार, संदिप सरग, गौतम सपकाळे, राहुल सानप, सागर शिर्के, दीपक पाटील यांनी ही कारवाई केली आहे़

Web Title: Thief caught by police through a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.