भरदिवसा चोरट्याने मारला दुकानात डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 09:18 PM2019-11-04T21:18:16+5:302019-11-04T21:18:46+5:30

चिल्लर लंपास : भरवस्तीतील घटनेमुळे दहशत

The thief hit the shop all day long | भरदिवसा चोरट्याने मारला दुकानात डल्ला

भरदिवसा चोरट्याने मारला दुकानात डल्ला

Next

धुळे : शहरातील गल्ली नंबर चार मधील जुगल वस्त्रालय शेजारी असलेल्या एका दुकानात हातसफाई करीत दोन ते तीन हजाराची चिल्लर लंपास केल्याची घटना सोमवारी भरदिवसा घडली़ या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ 
शहरातील गल्ली नंबर ४ मधील परिसरात सकाळपासूनच वर्दळ सुरु झालेली असतानाच चोरट्याने जुगल वस्त्रालयाशेजारी असलेल्या शंकर होम अप्लायन्सेस या दुकानाचे पाठीमागील गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला़ शोधाशोध करुन दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली दोन ते तीन हजाराची चिल्लर एका पिशवीत टाकली़ त्यानंतर चोरट्याने पोबारा केला़ चोरीची ही घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराने कैद केलेली आहे़ याच कॅमेरात चोरट्याचा चेहरा देखील स्पष्टपणे दिसत आहे़ 
दुकान उघडण्यासाठी आलेले दुकानाचे मालक किर्ती शंकरराव मदान यांच्या निदर्शनास ही बाब आली़ त्यांनी या घटनेची माहिती आझादनगर पोलिसांना दिली़ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत माहिती जाणून घेतली आहे़ तसेच सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे़ 

Web Title: The thief hit the shop all day long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.