चिमठाण्यात चोरट्यांचा बँक फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:22 PM2019-09-23T22:22:11+5:302019-09-23T22:22:30+5:30

हैदोस : मेडीकल दुकानांमध्येही हातसफाई

Thieves try to break into bank | चिमठाण्यात चोरट्यांचा बँक फोडण्याचा प्रयत्न

चिमठाण्यात चोरट्यांचा बँक फोडण्याचा प्रयत्न

Next

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी हैदोस घातला़ बँक फोडण्याचा प्रयत्नही केला़ हाती काही सापडले नाही तर त्यांनी गावातीलच काही मेडीकल दुकानही फोडले़ या घटनांमुळे गावाती भीतीचे वातावरण निर्माण झाले़ 
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील बँक आॅफ इंडीयाच्या शाखेत चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला़ नेहमी प्रमाणे बँक कर्मचारी बँकेत आले असता शटरचे कुलूप तुटलेले त्यांना दिसल्याने त्यांच्या मनात शंका निर्माण झाली़ वरिष्ठ अधिकाºयांना कळविल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांनाही कळविण्यात आली़ लगोलग घटनेचे गांंभिर्य ओळखून धुळ्याहून श्वान पथकासह ठसे तज्ञही घटनास्थळी दाखल झाले़ चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडल्यानंतर बँकेत प्रवेश केला़ शिवाय ड्राव्हर धुंडाळून रोकडही शोधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही़ या बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत़ चोरट्यांचा हा घटनाक्रम याच कॅमेरात कैद झालेला आहे़ हे चोरटे ४ ते ५ जण होते़ 
त्याचप्रमाणे बँक परिसरातील अन्य तीन मेडीकल दुकानेही चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे़ त्यांच्या हाती नेमके काय लागले हे मात्र सायंकाळी उशिरापर्यंत समजू शकलेले नाही़ असे असलेतरी एकाच रात्री चोरीच्या चार लगोलग घटना घडल्याने चिमठाणे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ 

Web Title: Thieves try to break into bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे