तिसगावात उष्माघाताने चार मेंढय़ांचा मृत्यू
By Admin | Published: May 7, 2017 12:39 PM2017-05-07T12:39:20+5:302017-05-07T12:39:20+5:30
धुळे तालुक्यातील तिसगाव येथे उष्माघातामुळे चार मेंढय़ांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
तिसगाव, जि.धुळे, दि.7 - धुळे तालुक्यातील तिसगाव येथे उष्माघातामुळे चार मेंढय़ांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. यापूर्वीही याच परिसरात दोन जर्सी गायींचा उष्माघातानेच मृत्यू झाला होता. या मुळे पशुपालकांमध्ये धास्ती पसरली आहे. शनिवारी जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस या उच्चांकी तापमानाची झाली होती.
येथील आदिवासी समाजातील मेंढपाळ सुरेश यशवंत भिल यांच्या मालकीच्या 10 मेंढय़ा शनिवारी सकाळी जंगलात चराईसाठी गेल्या होत्या. चरताना त्यांना तीव्र उन्हाचा तडाखा बसल्याने 10 पैकी चार मेंढय़ांचा मृत्यू झाला. सुरेश भिल मेंढय़ा पाळून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. परंतु या घटनेमुळे त्यांच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. मेढय़ांची अवस्था पाहून ते त्यांना पाणी आणण्यासाठी गेले. पाणी आणेर्पयत आणखी दुस:या तीन मेंढय़ांचीही तीच गत झाली. त्यामुळे भिल दाम्पत्य घाबरले. त्यांनी जवळच्या शेतक:याच्या बैलगाडीने या मेंढय़ा घरी आणल्या. पशवैद्यकीय अधिका:यास बोलवून उपचारही सुरू केले. परंतु रात्री ठराविक अंतराने चारही मेंढय़ांचा मृत्यू झाला. यामुळे भिल कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.