तृतीयपंथीयांनी केले श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 10:20 PM2019-05-04T22:20:59+5:302019-05-04T22:21:43+5:30
वादळी पाऊस, गारपीट : ४४२.५८ हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान
रवींद्र बोरसे।
ंिवंचूर : तालुक्यातील दोंदवाड येथे वाटरकप स्पर्धेत निमित्त घेण्यात येणाऱ्या महाश्रमदानासाठी हजारो हात एकवटले आहे़ त्यासाठी बुधवारी सकाळी धुळे शहरातील यल्लमा माता जोगीण टीम, यीन टीम तसेच अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला होता़
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतर्फे दोंदवाड गावात महाश्रमदान आयोजित करण्यात आले होते. गावात आतापर्यंत श्रमदानाच्या माध्यमातून सी.सी.टी शेततळ्यासह शेतावरील बांधाचे काम पुर्णत्वास आले आहे़ तसेच महीलांच्या सहभागातुन परसबागे देखील तयार झाली आहे़ श्रमदानाचा उत्साह कायम ठेवत दोंदवाड येथील ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी महाश्रमदानात सहभाग नोंदविला होता. धुळे येथील यल्लमा माता मंदीराच्या तृतीयपंथी रेणूका व स्वरा जोगी यांनी हातात कुदळ व फावडे घेऊन श्रमदान करून ग्रामस्थांसमोर आदर्श ठेवला. नागरिकांनी एकजूट होऊन पाणी फाऊंडेशनसारख्या विधायक उपक्रमात सहभाग घेण्याची नितांत गरजे आहे़ तरच आपन भविष्यात पाणीटंचाई वर मात करून शकतो असे यावेळी स्वरा जोगी यांनी सांगितले़ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी श्रमदान केले़
यावेळी अनिसचे दिलीप खिवसरा, किरण ईशी, प्रज्ञा साळवे, नवल ठाकरे, मनिषा ठाकुरे, सुरेश बिराडे, जागृती बोरसे, प्रकाश पाटील, सुवर्णा भदाणे आदींनी उपस्थित श्रमदान केले़