बारावीच्या निकालात धुळे जिल्हा विभागात तिसऱ्या स्थानी; निकाल ९२.२९ टक्के
By अतुल जोशी | Published: May 25, 2023 03:13 PM2023-05-25T15:13:51+5:302023-05-25T15:15:11+5:30
जिल्ह्यात ४६ केंद्रावर बारावीची परीक्षा झाली होती. परीक्षेसाठी २३ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीहोती. त्यापैकी २३ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
धुळे :राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा ॲानलाइन निकाल गुरूवारी जाहीर झाला. धुळे जिल्ह्याचा निकाल ९२.२९ टक्के एवढा लागला असून नाशिक विभागात धुळे जिल्हा तृतीयस्थानी आहे.
जिल्ह्यात ४६ केंद्रावर बारावीची परीक्षा झाली होती. परीक्षेसाठी २३ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीहोती. त्यापैकी २३ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून २१ हजार ६०८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. या विशेष प्राविण्य २६५९ विद्यार्थ्यांनी मिळविले आहे. तर ८९९० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ८६४० द्वितीय श्रेणीत, तर १३१९ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे. विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०.६८ तर विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.४२ एवढी आहे. दरम्यान गेल्यावर्षी बारावीच्या निकालात धुळे जिल्हा विभागात पहिल्या स्थानी हाेता. यावर्षी मात्र निकालात घसरण झाल्याने, जिल्हा निकालात विभागात तृतीयस्थानी आहे.