राईनपाड्याच्या हत्याकांडातील तिसरा संशयित जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:41 PM2018-07-08T13:41:34+5:302018-07-08T13:44:41+5:30

एलसीबीची कामगिरी : वार्साच्या जंगलात लपला होता

The third suspect in the murder of Ranepad was Ziharband | राईनपाड्याच्या हत्याकांडातील तिसरा संशयित जेरबंद

राईनपाड्याच्या हत्याकांडातील तिसरा संशयित जेरबंद

Next
ठळक मुद्देराईनपाडा गावातील हत्याकांड दोन आरोपींनी तिसराही जेरबंदएलसीबीची धडक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात घडलेल्या हत्याकांडातील तिसरा संशयित आरोपी दशरथ काडग्या पिंपळसे (३५) याला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या पथकाने वार्सा येथील जंगलातून शोधून काढले़ ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली़ त्याला अटक करण्यात आली आहे़ याप्रकरणातील पहिला आरोपी महारु वनक्या पवार आणि दुसरा हिरालाल गवळी आहे़ 
साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासी बहुल भागात रविवारी घडलेल्या सामुहिक हत्येनंतर उमटलेले तीव्र पडसाद आणि त्यामुळे लावण्यात आलेला पोलिसांचा बंदोबस्तामुळे गावात स्मशान शांतता पसरली आहे़ आठ दिवस होऊनही परिस्थिती सारखीच आहे़ वेगवेगळ्या अफवा पसरविल्या गेल्याने आणि त्या व्हायरल होत असल्याने हे पाचही निरपराध बळी ठरले़ किरकोळ वाद होणाºया गावात इतकी मोठी घटना घडल्याने त्याचे पडसाद आजूबाजूच्या पाड्यांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे़ राईनपाड्यासारख्या गावात कधी नव्हे इतकी मोठ्या प्रमाणात हत्याकांड झाल्याची खळबळजनक घटना घडली़ गावातील बहुसंख्य पुरुष मंडळी अगदी गाव सोडून पसार झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ 

Web Title: The third suspect in the murder of Ranepad was Ziharband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.