सुळे गावात सलग तिसऱ्यांदा ढोलताशांच्या गजरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:39 PM2019-10-25T13:39:36+5:302019-10-25T13:40:11+5:30

शिरपूर : दिवाळीपूर्वीच फटाक्यांची आतिषबाजी करुन स्वागत

For the third time in the village of Sule, the shouting of the Dholtash's alarm | सुळे गावात सलग तिसऱ्यांदा ढोलताशांच्या गजरात जल्लोष

dhule

Next

शिरपूर : नियतीच्या कधीही स्वप्नात नसेल असे आदिवासी भागातील सुळे गावात अपूर्व अशी दिवाळी, दिवाळीपूर्वीच विजयश्रीच्या निमित्ताने जल्लोषात तिसऱ्यांदा साºया गावाने साजरा केलेली पहावयास मिळाली़
आदिवासींचा पहिला आमदार सन २००९ मध्ये माजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली सुळे या अवघ्या १२०० मतदारसंख्या असलेल्या गावाला पहावयास मिळाला होता़
सुळे गावाच्या स्वप्नात वा ध्यानीमनी नसेल की त्या गावात काशिराम वेचान पावरा यांच्या रूपाने आमदार अमरिशभाई पटेल यांच्या न्यायीकबुध्दीने आमदार मिळेल, पण ते स्वप्न नव्हते ते प्रत्यक्षातच साकार झाले़
त्यावेळी त्यांचा ‘न भूतो न भविष्यती’ असा अनोखा स्वागताचा, जल्लोषाचा देहभान होवून नृत्य काशिराम पावरा यांचे त्यांच्या सुळे या निवासी गावाने स्वागत केले होते़ दुसºयांदा ही संधी त्या गावाला मिळाल्यामुळे दिवाळीपूर्वीच खºया अर्थाने या गावात पुन्हा जल्लोष साजरा करण्यात आला होता अन् आताही दिवाळीपूर्वीच पावरा यांनी विजयाची ‘हॅट्रीक’ केली आहे. यंदाही दिवाळीपूर्वीच गावात जल्लोष साजरा करण्यात आला़
काशिराम पावरा हे केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हते, तर ते झाले होते साºया गावांचे़ गावात घरा-घरातून जातपात धर्म विसरून सर्व माता-भगिनी त्यांचे औक्षण व स्वागत करण्यासाठी आतूरतेने वाट पहात होते़ काशिराम पावरा हेही तितक्याच उत्साहाने झालेला आनंद व्यक्त करता येत नव्हता़ तरीही चेहºयावर हास्य फुलवित माता-भगिनींचे, बंधुचे स्वागताचा स्विकार ते करीत होते़
बेभान होवून वयाचे भान विसरून ते आनंदाने नाचत होते़ दिवाळीपेक्षाही मोठा आनंद त्यांना या विजयाचा झालेला दिसून आला़ पावरा यांच्या चेहºयावर थकवा जाणवत असतांनाही लोकांच्या उत्स्फुर्त भावनांची आदर करीत त्यांच्या सत्काराचा स्विकार करीत होते आणि अभिवादन करतांना म्हणत होते, मी तुमचाच आहे़ हा विजय तुमचाच आहे, तुम्हीच आमदार आहात़
संत ठाकूरसिंग महाराज मला सन्मानाने जीवन जगण्याची शक्ती देवो व माझे राजकीय गुरू माजी आमदार अमरिशभाई पटेल यांची शक्ती मला आपल्या विकास कामांसाठी दुप्पटीने मिळो, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सरपंच ते आमदार
४राजकारणाशी वेचान वैरसिंग पावरा यांचा विशेष संबंध नव्हता़ सन १९८५ मध्ये गावाचे ते बिनविरोध सरपंच झाले़ त्यानंतर काशिराम पावरा सन १९९० पासून त्यांनी दोनंदा सरपंच पद भूषविले़ दरम्यानच्या काळात ते येथील मार्केट कमिटीचे संचालक सुध्दा झालेत़ एकनिष्ठतेमुळे त्यांना आमदारपटेल यांनी जिल्हा परिषदेवर १९९७ मध्ये पाठविले़ सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या पदावर त्यांची पत्नी गमताबाई पावरा यांना ग्रामस्थांनी विराजमान केले़ त्यांनीही दोन वेळेस हे पद भूषविले़
४सन २००९ मध्ये हा तालुका विधानसभेसाठी राखीव झाल्यामुळे आमदार पटेल यांचे निकटवर्तीय व विश्वासू समजलेले जाणारे काशिराम पावरा यांना आमदारकीची संधी मिळाली़ त्यांनी संधीचे सोने करत तालुक्याच्या विकासात भर टाकली़ संत ठाकूरसिंग महाराज यांनी दिलेल्या विचारानेच जीवन जगावे या तत्वाने त्यांनी कोणाचेही मने दुखविली नाहीत़ त्यांचे शिक्षण चौथीपर्यंत असले तरी पटेल बंधूच्या सानिध्यात आल्यामुळे ते फाडफाड बोलू लागले आहेत़

Web Title: For the third time in the village of Sule, the shouting of the Dholtash's alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे