दीड लाखांचे ठिबक साहित्य चोरटय़ांनी केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 12:43 PM2017-05-18T12:43:08+5:302017-05-18T12:43:08+5:30

याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े

Thirteen lakhs of dripping materials were made by the thieves | दीड लाखांचे ठिबक साहित्य चोरटय़ांनी केले लंपास

दीड लाखांचे ठिबक साहित्य चोरटय़ांनी केले लंपास

Next

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 18 - धुळे तालुक्यातील गोंदूर शिवारातील पाच शेतांमधून चोरटय़ांनी 1 लाख 55 हजार 785 रूपये किंमतीचे ठिबक संचाचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आह़े याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात  गुन्हा दाखल झाला आह़े
गोंदूर शिवारातील छोटूलाल भिवसन पाटील यांच्या शेतातून चोरटय़ांनी 68 हजार रूपये किंमतीचे ठिबक नळीचे 17 बंडल तसेच त्यांचे भाऊ विनोद भिवसन पाटील यांच्या शेतातील 64 हजार रूपये किंमतीचे  16 बंडल व 3 हजार 685 रूपयांचे फिल्टर, प्रकाश हरी पाटील यांच्या शेतातून 10 हजार 50 रूपयांचे 3 बंडल व प्रभाकर नथ्थू पाटील यांचे शेतातूनही 10 हजार 50 रूपयांचे ठिबकच्या नळ्यांचे 3 बंडल असे एकूण  1 लाख 55 हजार 785 रूपये किंमतीचे साहित्य चोरटय़ांनी लंपास केले.  
या प्रकरणी छोटूलाल पाटील यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  

Web Title: Thirteen lakhs of dripping materials were made by the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.