त्या कर्मचाऱ्यांनी घेतला सेल्फ क्वारटाईनचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 06:31 PM2020-05-12T18:31:00+5:302020-05-12T18:33:55+5:30
पोस्ट आफीस १४ दिवसांसाठी बंद
धुळे- येथील पोस्ट आॅफीस मधील अधिकारी कोरोना पॉजीटीव्ह आढळला होता. त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. या गोष्टीचा धसका घेत पोस्ट आफीस मधील कर्मचाऱ्यांनी १४ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील १४ दिवस सेल्फ क्वारंटाईन होणार असल्याचे पत्र त्यांनी महानगर पालिकेच्या अधिकाºयांना दिले आहे.
एखादा व्यक्ती पॉजीटीव्ह आढळला तर त्याच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्याच्या जागतिक आरोग्य संघाटनेच्या सुचना आहेत. तसेच कार्यालयातील कर्मचा?्याला कोरोनाची लागण झाली तर सहनीटायजेशन करावे व ४८ तासांसाठी कार्यालय बंद ठेवावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्याप्रमाणे पोस्ट कार्यालय सनिटाईज केले आहे मात्र कार्यालय बंद करण्याचा निर्णय स्वत: कर्मचाºयांनी घेतला असल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.महेश मोरे यांनी दिली.