विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना उन्हाचे चटकेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:18 PM2020-05-08T22:18:47+5:302020-05-08T22:19:07+5:30
मोहाडी पोलीस : जागेवरच उठा-बशा, कोणाला विना चप्पल पळविले
धुळे : लॉकडाउन असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही़ दुचाकी घेऊन ट्रिपल सिट फिरणारे, विनाकारण फिरणाºया युवकांना मोहाडी पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांनी विना चप्पल भर उन्हात पिटाळले़ त्यामुळे अनेकांनी पोलिसांना पाहून त्या भागाकडे जाणे टाळले़
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कसोशिने प्रयत्न सुरु आहेत़ नागरीकांनी देखील घरीच थांबणे अनिवार्य असताना विनाकारण फिरणाºयांची संख्या काही कमी होताना दिसत नाही़
पोलिसांकडून काठीचा प्रसाद
शहरातील पारोळा रोडसह आग्रा रोडवर सोमवारी सकाळी अचानक गर्दी झाली होती़ संचारबंदीत सकाळी मिळणारी सूट लक्षात घेता अनेकांनी आग्रा रोडवर धाव घेतली होती़ परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी सुरुवातीला गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला़ पण, कोणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला़ या गर्दीत कामाव्यतिरिक्त विनाकारण फिरणाºयांची संख्या अधिक होती़ त्यामुळे काही काळ या भागात पळापळ झाली होती़ अनेकांनी हे पाहून तिकडे फिरकलेच नाही़
मोहाडी पोलीस आक्रमक
मोहाडी पोलीस ठाणे अंतर्गत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग येतो़ मोहाडी उपनगरासह काही गावांचा देखील समावेश आहे़ याठिकाणी पोलिसांची गस्त सुरु असताना घरातच थांबण्याच्या सुचना वारंवार दिल्या जात असतात़ शेतीच्या कामांसंदर्भात सोडल्यास गावात आणि महामार्गावर विनाकारण फिरणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ असे असताना गुरुद्वाराजवळ मोहाडी पोलिसांचे पथक संगिता राऊत यांच्या नेतृत्वाखाली उभे होते़ त्यावेळी दुचाकीवरुन येणाºया तरुणांची विचारपूस केल्यानंतर विनाकारण फिरणाºयांना भर उन्हात काही अंतर पळविण्यात आले़ या शिक्षेमुळे बºयाच जणांनी तिकडे जाणे टाळले़
घरीच थांबण्याचे वारंवार सांगूनही लोकं ऐकत नाही़ विनाकारण फिरतात़ त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत सांगण्याची वेळ आली आहे़ काही वेळेस शिस्तीचे पाठ द्यावे लागतात़
- संगिता राऊत, सहायक पोलीस निरीक्षक, मोहाडी