‘लाटीपाडा’चे हजारो लिटर पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:06 PM2018-12-01T22:06:34+5:302018-12-01T22:07:11+5:30

उजवा कालवा : अज्ञाताने दरवाजा लावल्याने घडला प्रकार; पिण्याच्या पाण्यासाठी सोडले होते आवर्तन

Thousands of liters of 'Latipada' water on the road | ‘लाटीपाडा’चे हजारो लिटर पाणी रस्त्यावर

‘लाटीपाडा’चे हजारो लिटर पाणी रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : छाईलसह काटवान भागात पिण्याच्या पाण्यासाठी लाटीपाडा धरणातून हजारो क्यूसेस पाणी उजव्या कालव्यातून सोडण्यात आले होते. येथील दरवाजास कुलूप नसल्याने कोणी अज्ञातांनी दरवाजा लावल्याने उजवा कालवा ओव्हरफ्लो होवून हजारो लिटर पाणी पिंपळनेर-सटाणा रस्त्यावर वाहत असून या रस्त्यावरील भुसार व्यापाºयांच्या गोडाऊनमध्ये पाणी शिरल्याने शेकडो क्विंटल मका ओला झाला. याकडे पाटबंधारा विभागाचे दुर्लक्ष दिसून येते.
शुक्रवारी रात्री १० वाजेपासून लाटीपाडा धरणाच्या पिंपळनेरच्या उजव्या कालव्यातून हजारो क्यूसेस पाणी छाईल, प्रतापपूर, दिघावे, उंभरेसह काटवान भागात पिण्याच्या पाण्याचे निमित्ताने सोडले आहे. 
आठ दिवसापेक्षा जास्त दिवस सुरू असलेले पाणी उजव्या कालव्यावरील तीन दरवाजांना कुलूप नसल्याने गुरुवार २९ रोजी कुणीतरी दरवाजा बंद करुन पाणी चोरुन नेण्याचा प्रकार केला. मात्र दरवाजा बंद असल्याने संपूर्ण उजवा कालवा हा ओव्हलफ्लो होऊन इतरत्र व पिंपळनेर, बाम्हणे रस्त्याने नाल्याला पूर यावा तसा पाण्याचा लोंढा थेट अ‍ॅड.ज्ञानेश्वर एखंडे यांच्या सटाणा रस्त्यावरील लॉन्सपर्यंत रस्त्यावर पूर आला होता. हे पाणी थेट पिंपळनेर देशशिरवाडे रस्त्याच्या हायवेने पाणी वाहत होते. मात्र पाटबंधारे विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या क्षेत्रातील शेतकरी निंबा गेंदा एखंडे यांनी सकाळी सहा वाजता मिडीयाशी संपर्क साधला. याप्रकरणी आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष पाहणी करण्यास गेले असता शेतीला एवढे पाणी सोडले असते तर ७० ते ८० एकर शेती ओलीताखाली आली असती, असे दिसून आले. काही शेतकºयांनी कांदे लावणीसाठी शेती तयार केली होती. मात्र पाणी घुसल्याने कांदे लावणी आता आठ दिवसावर गेली आहे.
याबाबत आमचे प्रतिनिधी पाटबंधारे विभागाचे स्थापत्य व्यवस्थापक हिरे यांचेशी दूरध्वनीवरुन संपर्क केल्यावर त्यांनी दरवाजात चारा, घाण अडकल्याचे खोटे कारण सांगितले. मात्र प्रत्यक्षात या दरवाजाजवळ घाण नव्हती. तेथे दरवाजाला कुलूप नसल्याने दरवाजा बंद केल्याने उजव्या कालव्याचे पाणी पिंपळनेर सटाणा हायवेवर वाहत    होते.

Web Title: Thousands of liters of 'Latipada' water on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे