Vidhan Sabha 2019 : हजारोंच्या साक्षीने कुणाल पाटील यांची उमेदवारी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 10:44 PM2019-10-04T22:44:36+5:302019-10-04T22:45:40+5:30
रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले : जेलरोडवर झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी केले मार्गदर्शन
धुळे : कार्यकर्ते, मतदार, तरूणांचा प्रचंड उत्साह, घोषणा तसेच ढोल ताशांच्या गजरात शक्ती प्रदर्शन करीत विराट जनसमुदायाच्या साक्षीने आमदार कुणाल पाटील यांनी धुळे विधानसभा मतदार संघातून कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. धुळे तालुका हे माझे कुटुंब असून, तुमच्यासाठी अहोरात्र काम करेल. वेळ आली तर तालुक्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल असे अभिवचन आमदार पाटील यांनी यावेळी दिले.
कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी १० वाजता देवपुरातील एस.एस.व्ही.पी. एस. महाविद्यालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. रॅली जेल रोडवर आल्यावर तेथे रॅलीचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी मान्यवरांसह स्वत: आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सभेला माजी मंत्री रोहीदास पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, पंचायत समितीचे उपसभापती दिनेश भदाणे, माजी सभापती मधुकर गर्दे, विनय पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, प्रमोद जैन, कृउबाचे माजी सभापती गुलाबराव कोतकर, शिवाजी पाटील, पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, गुलाबराव पाटील, भगवान गर्दे, चेअरमन लहू पाटील, विजय पाटील, शांताराम भिल, कृउबाचे उपसभापती रितेश पाटील, माजी पं.स. सदस्य अविनाश महाजन, योगेश पाटील, पंढरीनाथ पाटील, भानुदास माळी, जगन्नाथ जाधव, गायत्री जयस्वाल, डॉ. दरबारसिंग गिरासे, वसंत पाटील, माजी पं.स.सदस्य वाल्मीक वाघ, अशोक सुडके, कृष्णकांत माळी, सरपंच किरण पवार, भटू चौधरी, छोटू चौधरी, सरपंच धनराज महाले, गुणवंत वाघ, दिनेश पाटील, शिरीष सोनवणे, हसन पठाण, यांच्यासह तालुक्यातील ग्रा.प.सदस्य, पं.स., जि.प.सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.