सुरत महामार्गावरील हॉटेलमधून सव्वा तीन लाखांचा मद्यसाठा जप्त
By Admin | Published: May 30, 2017 01:28 PM2017-05-30T13:28:48+5:302017-05-30T13:28:48+5:30
साक्री पोलिसांची कारवाई
ऑनलाईन लोकमत
साक्री,दि.30 - साक्री पोलिसांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सुरत-नागपूर महामार्गावर हॉटेल साईवर छापा टाकून एका कारसह विदेशी मद्यसाठा असा एकूण 3 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हॉटेल मालकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने 1 एप्रिलपासून महामार्गालगत दारूविक्रीस बंदी घातली आहे. त्यानुसार सुरत-नागपूर महामार्गालगत असलेल्या हॉटेल साई येथे छुप्या पद्धतीने दारू विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती साक्री पोलिसांना मिळाली. त्यानुसार साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, लक्ष्मीकांत वाघ, पी. सोनवणे, सोमनाथ पाटील, सुरेश पाटील यांनी हॉटेलवर छापा टाकला.