दोंडाईचात बंद घरात तीन लाखांची घरफोडी
By admin | Published: January 9, 2017 11:23 PM2017-01-09T23:23:11+5:302017-01-09T23:23:11+5:30
खिडकीतून प्रवेश : रोख रकमेसह दागिने लंपास
धुळे : दोंडाईचा येथील जैन कॉलनीतील बंद घराची खिडकी उघडून चोरटय़ांनी घरात प्रवेश मिळविला. घरातून रोख रकमेसह 2 लाख 95 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन तेथून पसार झाल्याची घटना रविवारी घडली़ याप्रकरणी अज्ञात चोरटय़ांविरुध्द दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
दोंडाईचा येथील जैन कॉलनीतील प्लॉट क्ऱ 27 मध्ये नारायणसिंग पहाडसिंग गिरासे (वय 54) हे राहतात़ घर बंद असल्याची संधी साधत चोरटय़ांनी 8 जानेवारी रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान घराची खिडकी उघडून आत प्रवेश केला़ घरातून रोख 86 हजार रुपये, 2 लाख 1 हजार 600 रुपये किमतीचे 72 ग्रॅम सोन्याचे दागिने व 8 हजार रुपये किमतीचे 125 ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीट चोरून नेल़े याप्रकरणी रविवारी दुपारी घरी परतलेले घरमालक नारायणसिंग गिरासे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुध्द भादंवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे करत आहेत़
शिरपुरातही घरफोडी
शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे राहणा:या उषाबाई ब्रिजलाल पाटील (वय 60) यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरटय़ांनी पाण्याचा पंप, पाण्याच्या दोन घागरी, पाण्याचे गंगाळे, ताब्याचा पिंप, पाटल्या, बाह्या, गव्हाचे दोन पोते व 1 हजार 500 रुपये रोख चोरून नेल़े ही घटना 24 डिसेंबर 2016 ते 2 जानेवारी 2017 दरम्यान घडली़ याप्रकरणी उषाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुध्द शिरपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आह़े
गुन्ह्याचा तपास पो़ह़ेकॉ सोनवणे करत आहेत़