पार्कीग व्यवस्थेचे ‘तीन-तेरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:03 PM2019-09-10T23:03:24+5:302019-09-10T23:05:33+5:30

महापालिकाकडून डोळेझाक पणा

'Three-thirteen' of the parking system | पार्कीग व्यवस्थेचे ‘तीन-तेरा’

dhule

Next

धुळे : शहरातील प्रमुख रस्ते, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, दुकाने, बॅकांसमोरीन पॉर्किंगच्या समस्यांना धुळेकरांना रोजच सामोरे जावे लागत आहे़ महापालिकाकडून डोळेझाक पणा केला जात असल्याने शहरातील पार्कीग व्यवस्थेचे तीन-तेरा झाले आहेत़ अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’ च्या सर्वेक्षणात नागरिकांंनी व्यक्त केली़
शहरातील बेशिस्त पॉर्किंग, कर्कश आवाजातील हॉर्न, वाहतुक नियमांचे उल्लंघन अशा रोजच्या समस्यांना तोंड देत व जीव मुठीत धरून धुळेकरांना शहरातुन मार्ग काढत घरी सुखरूप पोहचावे लागते़ मात्र प्रशासनाकडून अवैध पॉर्किंगबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होते.
वाहतूक ताणावर उपाय
शहराची वाढती लोकसंख्या तसेच वाहनसंख्येत होणारी वाढ यामुळे वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे़ शहरात पॉर्किंग प्रश्न निर्माण झाला आहे़ हा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा मालकीचे भुखंड व खाजगी जागांवर सशुल्क वाहनतळाची व्यवस्था तातडीने करण्याची गरज आहे़ तरच शहरातील पॉर्किंगचा प्रश्न निकाली निघू शकतो़
सिग्नल यंत्रणेचा बोजवारा
चौका-चौकातील सिग्नल यंत्रणेचा बोजवाऱ्यामुळे परिवर्तनाची आस धरून असलेल्या शहरास सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने चांगलेच ग्रासले आहे. बेशिस्त वाहनचालक, वाढलेली गर्दी, दिरंगाईने होणारी रस्त्याची कामे आणि त्यामुळे अरुंद झालेले रस्ते, यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. मुख्य रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा केवळ देखाव्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराणा प्रताप चौका, गल्ली नं.६ तसेच आग्रारोडवर, मालेगावर रोड, गोलचौकी, संतोषी माता, दत्तमंदिर तालुका पोलिस स्टेशन अशा मुख्य मार्गावर सतत होण्याºया वाहतूकीच्या कोंडी नागरिकांना रोजच सामारे जावे लागत आहे़

Web Title: 'Three-thirteen' of the parking system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे