दोंडाईचात भरदिवसाचा घरातील थरार, चाकूचा धाक दाखवून दागिने हिसकाविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 10:33 PM2020-09-07T22:33:06+5:302020-09-07T22:33:28+5:30

लूट झालेले दागिने ५० हजार रुपये किंमतीचे

Throughout the day in Dondaicha, the house was shaken, the jewelery was snatched with the fear of a knife. | दोंडाईचात भरदिवसाचा घरातील थरार, चाकूचा धाक दाखवून दागिने हिसकाविले

दोंडाईचात भरदिवसाचा घरातील थरार, चाकूचा धाक दाखवून दागिने हिसकाविले

Next

दोंडाईचा : विक्रीला काढलेले घर बघण्याचा बहाण्याने घरात घुसून लहान मुलाला चाकूचा धाक दाखवित महिलेच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याची घटना भरदुपारी २ वाजेच्या सुमारास दोंडाईचा शहरात घडली़ लूट झालेले दागिने ५० हजार रुपये किंमतीचे आहेत़ घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले़
दोंडाईचा येथील शिवकॉलनीतील प्लॉट क्र १७ येथे हेमंत पवार यांचे घर आहे. या घरात रोटरी इंग्लिश स्कूलला उपशिक्षक असलेले भरत निंबाजी पवार भाडेकरु म्हणून वास्तव्यास आहेत. ते शाळेत गेले असतांना पत्नी जयश्री व आठ वर्षाचा मुलगा घरात होते. हेमंत पवार यांचे घर विक्रीला काढले आहे. घर खरेदी करावयाचे असून आम्हास घर बघायचे आहे, या बहाण्याने एक पुरुष, एक महिला व एक मुलगा यांनी घरात प्रवेश केला. जयश्री पवार या किचन दाखवित असताना त्या पुरुषाने गेट लावले तर त्याच्या सोबतच्या मुलाने कपाट उघडले. त्याचवेळी झोपलेल्या मुलाला चाकू लावून त्या महिलेला अंगावरील दागिने काढून घेण्याचे सांगितले़ सोन्याचे मंगळसूत्र व कानातल्या रिंगा हिसकावून घेतल्या. जयश्री पवार जोरात आरोळी मारतील या भीतीने डोक्यात चाकूसारखी वस्तू मारून फेकली. व मोबाईल फेकून देऊन त्याची तोडफोड केली. जयश्री पवार या महिला अतिशय घाबरल्या होत्या.
दरम्यान भरत पवार घरी आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली़ घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, पोलीस उपनिरीक्षक डॉ़ संतोष लोले व पथकाने भेट दिली़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Throughout the day in Dondaicha, the house was shaken, the jewelery was snatched with the fear of a knife.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे