गुरूवारी १५२ अहवाल पॉझिटिव्ह, पाच रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 09:14 PM2020-08-27T21:14:24+5:302020-08-27T21:14:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी १५२ अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, धुळे ...
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील आणखी १५२ अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये, धुळे शहरातील दोन, शिंदखेडा, दोंडाईचा व साक्री तालुक्यातील निजामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
गुरुवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ६७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील २३, शिंदखेडा तालुक्यातील ४३, शिरपूर तालुक्यातील १४ व साक्री तालुक्यातील पाच रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ८२२ इतकी झाली आहे.