पिंपळनेरला टिळक वाचनालयाचे शंभर वर्षात पर्दापण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:00 PM2020-08-01T23:00:40+5:302020-08-01T23:01:12+5:30
विविध कार्यक्रम उत्साहात
पिंपळनेर : येथील लोकमान्य टिळक वाचनालयाने शंभर वर्षात पदार्पण केल्याने शनिवारी छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला़ त्याचवेळेस ग्रंथालयाला अभ्यासिका बनवा यासाठी अपर तहसीलदार विनायक थवील यांनी पुढील बांधकामास दहा हजार रुपयाची मदत देऊन सुरुवात देखील केली.
लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. अध्यक्षस्थानी सुरेंद्र मराठे होते. तर व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष भागवताचार्य मकरंद वैद्य, अप्पर तहसीलदार विनायक थविल, स्वातंत्र्यसैनिक कमलाकर बोळे, सरपंच साहेबराव देशमुख, डॉ. कोरडे, पंचायत समिती सदस्या सविता पगारे, प्रा. डी. टी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे, वाचनालयाचे सचिव किशोर विसपुते उपस्थित होते. मकरंद वैद्य यांनी शंभर वर्षाचा संक्षिप्त लेखाजोखा मांडला़ कुमीदिनी विसपुते यांनी लोकमान्य टिळकांच्या विविध कार्यावर प्रकाशझोत टाकला़ यावेळी थोर महा पुरूषांचे हस्तलिखीत अभिप्राय पहावयास मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर विसपुते, ग्रंथपाल भूषण कोठावदे, योगेश भामरे यांनी प्रयत्न केले.