वेळेचा सद्उपयोग झालाच पाहिजे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 10:43 PM2020-04-12T22:43:46+5:302020-04-12T22:44:35+5:30
सद्उपयोग करुन अध्यात्मिक प्रगती साधता येईल़
सध्या कोरोना व्हायरस या संसर्गजन्य महामारीमुळे संपूर्ण मानवी जीवनास महाआपत्ती आलेली आहे़ आपल्या भारत देशानेही या आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी जे अनेक उपाय केले त्यात एक उपाय म्हणजे संपूर्ण लॉकडाउऩ ही पण एक उपाययोजना आहे़ अशावेळी आपल्या धार्मिक परंपरा, सणवार, उत्सव, नित्यनेम, वारी, यात्रा इत्यादी प्रश्न कसे हाताळायचे? या विषयी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे़ त्याविषयी काही गोष्टी़़़़
१) नित्यनेम :- आपण जे काही धार्मिक नित्यनेम करतो ते घरी बसून सहजच करता येतील़ या उलट निवांत वेळ मिळत असल्याने श्री तुकोबारायांच्या शब्दात सांगायचे म्हणजे, ‘‘ठायीच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा़ चिंतनासी न लगे वेळ, सर्वकाळ करावे’’ या उक्तीप्रमाणे वेळेचा सद्उपयोग करुन अध्यात्मिक प्रगती साधता येईल़
२) देवदर्शन (वारी) :- याबाबतीत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सोशल डिस्टेंस व आपल्यामुळे कोण्य दुसऱ्यास उपद्रव वा दु:ख हानी होणार नाही याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे़
‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पुजनाचे’
या बोधाप्रमाणे (येथे मत्सर या शब्दाचा अर्थ कोणाही विषयी असू या इतरांविषयी सहकार्याची भावना किंव उपद्रव रहित असा घ्यावयाचा) घरीच ईश्वर चिंतन करावे़
‘‘प्रपंच वोसरो, चित्त तुझे पायी मुरो
ऐसे करी गा पांडूरंगा, शुध्द रंगवावे चित्ता’’
श्री ज्ञानेश्वरी, गाथा यांचे वाचन, पारायण सहज घरी करता येऊन पारमार्थिक आनंद सहज घेता येईल़
३) सणवार :- सणवारही परिवारासह सर्वांनी आनंदाने करता येऊ शकतात़ सर्वजण (घरातील सदस्य) कुळधर्म, कुलाचार एकत्र असा योग क्वचित जुळून येतो़
४) सर्व जण घरीच असल्याने घरातील मुलांबाळासह नातवंडांना सकाळ, संध्याकाळ धार्मिक संस्कार करण्याची सुयोग्य वेळ हीच आहे़ सकाळी देवपुजा, स्त्रोत पठन, संध्याकाळी हरिपाठ, रामरक्षा, नारायण स्त्रोत इत्यादी हे सर्वजण मिळून (घरातील परिवारासोबत) म्हणण्यात एक वेगळा आनंद व संस्कार यापेक्षा वेगळा कोणता असू शकेल?
५) जनसेवा हीच ईश्वरसेवा :- वरील गोष्टी आपण घरात बसून करीत राहिल्याने आपल्या व जनतेच्या कल्याणासाठी करीत असून अत्यल्प का होईना जनसेवा हीच ईश्वर सेवा या गोष्टीचे समाधान होऊन (पॉझेटिव्ह थिंकींग) निष्क्रीयता न येता वेळेचा सद्पयोग होईल़
‘काळ सारावा चिंतेने’
अस्तू
हभप शंकर महाराज
विश्वस्तश्री द्वारकाधीश संस्थान, विखरण (देवाचे) ता़ शिंदखेडा