आदिवासी मुला-मुलींना दिल्या यशाच्या टिप्स्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:09 PM2019-01-08T22:09:53+5:302019-01-08T22:10:55+5:30
नियोजनानेच स्पर्धा परीक्षेत यश संदीप गावीत
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : नियोजनबध्द अभ्यास, प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटीनेच स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते. प्रतिकुल परीस्थितीमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळत असून सकारात्मक दृष्टीकोन बाळगुन विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात स्वत:ला झोकून दिले पाहीजे असे प्रतिपादन येथील पोलिस ठाण्याचे डीवायएसपी संदिप गावित यांनी मार्गदर्शन करतांना केले.
शिरपूर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आदिवासी विद्यार्थी वसतीगृहामार्फत स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन सत्राचे आयोजन येथील एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात घेण्यात आले. यावेळी डीवायएसपी संदिप गावित, ट्रायबल टेलेंट सर्च फॉउंडेशनचे बादल पटले, प्रा.रमेश पावरा, वसतीगृह अधिक्षक सुनील सानप, संदिप ठोंबरे, ज्योती सोनवणे, मनिषा धनगर, मनोज पावरा, गायकवाड, शिवराम पाडवी, देवा पावरा, महेंद्र पावरा आदी उपस्थित होते.
डीवायएसपी संदीत गावीत म्हणाले, आगामी काळात कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागत असल्याने कॅरीयर घडविण्यासाठी शालेय वयापासूनच नियोजनबध्द तयारी केली पाहीजे. त्यासाठी गुणवत्तापुर्ण व दर्जेदार मार्गदर्शनाची गरज आहे. माणुस परिस्थितीमुळेच घडतो़ त्यातुनच संघर्ष करण्याचे बळ मिळत असल्याचे सांगत आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरावी त्यातूनच समाजाचा विकास शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमावर आधारीत वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षाही घेण्यात आली.