सावकारीला कंटाळून प्रौढाने जीवन संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:05 PM2020-10-07T12:05:24+5:302020-10-07T12:05:37+5:30

धुळ्यातील घटना : तिघांविरुध्द फिर्याद

Tired of lending, the adult ended his life | सावकारीला कंटाळून प्रौढाने जीवन संपविले

dhule

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तिघांकडून व्याजांच्या पैशांसाठी वारंवार तगादा लावणे, अपमान करणे, ठार मारण्याची धमकी देणे या जाचाला कंटाळून एका ५० वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे़ याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़
सुनंदा रमेश पाटील (४७, रा़ श्रमसाफल्य कॉलनी, देवपूर) या महिलेने फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, पती रमेश सखाराम पाटील (५०) यांनी ५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आपले जीवन संपविले़ अनिल साहेबराव पाटील (रा़ कृषी कॉलनी, देवपूर), राजेश नामदेव मराठे (रा़ मोहाडी) आणि संजय रघुनाथ बागुल (रा़ देवभाने ता़ धुळे) या तिघा संशयितांनी २०१५ ते २०२० या काळात व्याजाच्या पैशांसाठी वेळोवेळी फोन करणे, प्रत्यक्ष भेटून अपमान करणे, त्यांना शिवीगाळ करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, चिथावणी देवून आत्महत्येस प्रवृत्त करणे असे प्रकार सुरु होते़ सततच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप या तिघांवर लावण्यात आला आहे़ पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक सतीश गोराडे तपास करीत आहेत़

Web Title: Tired of lending, the adult ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.