जिल्ह्यात आजपासून महावृक्षालागवड मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:12 AM2019-07-01T11:12:55+5:302019-07-01T11:13:13+5:30
३३ कोटी वृक्षलागवड : दह्याणे येथे मोहिमेला सुरूवात ; सहभागी होण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत मध्ये ६५ लाख ७६ हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट आहे़ त्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्णत्वास आली आहे़ तालुक्यातील दह्याणे येथे सोमवार सकाळी १० वाजता महावृक्षारोपण अभियानाला प्रांंरभ होणार आहे़
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने किमान दोन रोपांची लागवड करुन तीन वर्षापर्यंत संगोपन करावे यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या आवारात, मोकळ्या भूखंडासह धुळे व नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीत ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे़ त्याच प्रमाणे वनहक्क कायद्यांतर्गत दिलेल्या सामूहिक वनहक्क जमिनीवर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे़
ग्रामीण भागात प्रात्सोहन
जिल्ह्यातील ७५ गांवामधून वृक्षारोपण अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया प्रत्येक गावातून दोन जणांसह स्वयंसेवी संघटनांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान केला जाणार आहे़ तसेच मोकळ्या भुखंडावर वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धन व संगोपनासाठी इच्छुकांशी त्रिपक्षीय करार देखील केला जाणार आहे़
मोहिमेला २०१७ पासून प्रांरभ
राज्य शासनाच्या ५० कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात २०१७ मधील पावसाळ्यात करण्यात आली होती़ २०१७ मध्ये ४ कोटी, २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी, तर यंदाच्या पावसाळ्यात ३३ कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले आहे़
स्थळांची नोंदणी
यंदाच्या पावसाळ्यात वृक्षलागवड करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ४ हजार १५६ स्थळांची नोंद वनविभागाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे़ त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार खड्डे खोदण्याचे काम पूर्ण केले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबरअखेर ही मोहिम राबविण्यात येणार आहे़
२५ हेक्टरमध्ये लागवड
जिल्ह्यात वनविभागाच्या २५ हेक्टर क्षेत्रात ४० हजार रोपांची लागवड करण्यात येईल, असेही उपवनसंरक्षक अण्णासाहेब शेंडगे यांनी सांगितले.
नर्सरीत रोपे तयारङ्घ
वृक्षारोपणासाठी जिल्ह्यात २९ विविध नर्सरीमध्ये विविध प्रजातीची रोपे तयार करण्यात आली आहे. त्यातील अनेक रोप एक ते दीड फूट उंचीची आहे.
बोरविहीर, गरताड, नंदाणे, लामकानी, वडेल, सांगवी, आंबा, जोयदा, नागेश्वर, नांदर्डे, करवंद, फारशीपाडा, फत्तेपुर, टेकवाडे, डोंगराळे, दुसाने, आमोदा, पाणखेडा, बारीपाडा, देवशिरवाडे, काळगाव, म्हसदी, सांजोरी याठिकाणी तयार करण्यात आलेल्या नर्सरीमध्ये ही रोपे आहेत.