आक्षेपार्ह फोटो काढून तरुणीवर अत्याचार, संशयिताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 10:07 PM2020-12-26T22:07:13+5:302020-12-26T22:07:34+5:30
गुंगीचे औषध देवून केला प्रताप, तरुणीच्या हिंमतीमुळे गुन्हा दाखल
धुळे - उपचाराच्या बहाण्याने तरुणीला गुंगीचे औषध देवून तिचे आक्षेपार्ह फोटो काढण्यात आले. त्या आधारे तिला ब्लॅकमिल करीत तिच्यावर अत्याचार केला. तिचे शोषण केल्याची धक्कादायक घटना साक्री तालुक्यात घडली. त्याच्यापासून सुटका करीत तिने निजामपूर पोलीस ठाण्यात एका विरुध्द शुक्रवारी फिर्याद दाखल झाली़ फिर्याद दाखल होताच संशयिताला अटक करण्यात आली.
साक्री तालुक्यातील टेंभे येथील २० वर्षीय तरुणीने पोलिसांना आपबिती सांगितली. २६ मार्च ते १३ डिसेंबर या कालावधीत अत्याचाराचा प्रकार घडला. साक्री तालुक्यातील महिर येथील दिनेश लहानू सरक याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या तरुणीची तब्येत बरी नसताना तिला सलाईन लावून त्या सलाईनमध्ये काहीतरी गुंगीचे औषध टाकण्यात आले. तिला बेशुध्द करण्यात आले. मोबाईलमध्ये तिचे नग्न अवस्थेत फोटो काढून नंतर तिला फोन करुन सांगण्यात आले. ते फोटो डिलीट करतो, पण भेटायला ये असे सांगून त्याने त्या तरुणीला साक्री येथील बसस्थानकार बोलाविले. तेथून त्याने त्या तरुणीला मोटारसायकलीवर बसूवन एका हॉस्पिटलमध्ये घेवून गेला. तेथील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत नेले. त्या ठिकाणी गेल्यावर फोटो डिलीट करण्यास सांगितल्यावर दिनेश याने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच सोबत जबरदस्तीने नग्न अवस्थेत फोटोही काढून घेतला. कोणाला काही सांगितले तर हे फोटो वॉटस्अॅपवरील डीपी म्हणून ठेवेन असे म्हणत धमकाविले. यानंतर वेळोवेळी फोन करुन होणाऱ्या नवऱ्याला हे फोटो पाठविन, तुझा साखरपुडा होवू देणार नाही असे धमकी देत त्रास दिला.
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर या तरुणीने हिम्मत करुन निजामपूर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यानुसार, संशयित दिनेश लहानू सरक (रा. महिर ता. साक्री) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुुरु आहे़