धुळ्यातील यात्रेत बुद्धीला चालना देणा-या खेळण्यांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 08:44 PM2018-04-06T20:44:30+5:302018-04-06T20:44:30+5:30

यात्रोत्सव : मंदिर परिसरात स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष; हरि ओम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार

The toy that drives the train to Dhule is a favorite | धुळ्यातील यात्रेत बुद्धीला चालना देणा-या खेळण्यांना पसंती

धुळ्यातील यात्रेत बुद्धीला चालना देणा-या खेळण्यांना पसंती

Next
ठळक मुद्देयात्रेत पेला, लहान ताटल्या, अगरबत्तीचे घर, मग, केर फेकण्याची सुपली, पायपुसण्या या फक्त दहा रुपयात उपलब्ध होत आहे.त्यामुळे यात्रोत्सवात तीन ते चार ठिकाणी बसलेल्या विक्रेत्यांच्या ‘हर एक माल’च्या स्टॉलवर भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. काही विक्रेत्यांच्या ‘हर एक माल’ च्या दुकानावरील वस्तूंच्या किमंती १०० रुपयांच्या पुढे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  : खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरादेवी यात्रोत्सवात दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवलेल्या चायना मेड खेळण्यांची भुरळ शहरातील लहान मुलांना घातली आहे.  तसेच बुद्धीला चालना देणाºया बुद्धिबळ, डिजीटल बाराखडी, इंग्रजी अक्षरे ओळखा या खेळण्यांनादेखील भाविकांकडून विशेष मागणी मिळत आहे. यात्रोत्सवात जीवनपयोगी वस्तू, खेळण्या खरेदीसाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. दरम्यान, शुक्र वारी सकाळी हरि ओम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. 
एकवीरा देवी यात्रोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे सकाळी व दुपारच्यावेळी भाविक यात्रोत्सवात दिसत नसले, तरी सायंकाळी सहा वाजेनंतर भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात होत आहे. यात्रेत दाखल झालेल्या विक्रेत्यांकडे मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल, अशा खेळण्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची माहिती सुरेश चौधरी  या विक्रेत्याने दिली.   तर आता मुलांच्या परीक्षा आटोपल्यामुळे सुट्टीत करमणुकीसाठी पालक त्यांच्या पाल्यांसाठी कॅरम, क्रिकेटचे साहित्य खरेदीकडेही विशेष भर देताना दिसत आहेत.  चायना मेड खेळण्यांमध्ये नानाविध प्रकार यात्रोत्सवात उपलब्ध आहेत. अगदी ५० ते थेट १ हजार रुपयांपर्यंतच्या खेळणी विक्रेत्यांच्या स्टॉलवर उपलब्ध आहे.  
रात्री उशिरापर्यंत यात्रा सुरू ठेवावी 
यात्रोत्सव सुरू होऊन पाच दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यात उन्हाची दाहकता वाढल्यामुळे भाविक सायंकाळनंतरच घराबाहेर पडतात. त्यात रात्री  अकरा वाजेनंतर पोलीस यात्रेतील दुकाने दुकाने बंद करण्याचे सांगतात. परिणामी, विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे.   त्यामुळे यात्रा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून होत आहे. 

Web Title: The toy that drives the train to Dhule is a favorite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे