भररस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 10:47 PM2019-12-08T22:47:37+5:302019-12-08T22:47:58+5:30
बारापत्थर परिसर : वाहने लावण्यास जागाच शिल्लक नसल्याने येतात थेट रस्त्यावर, मोठा रस्ता असूनही अरुंद होत असल्याचे स्पष्ट
धुळे : शहरातील बारा पत्थर चौकात लहान-मोठ्या व्यावसायिकांची संख्या बऱ्यापैकी आहे़ परिणामी याठिकाणी वाहनधारकांची संख्या देखील वाढलेली असते़ वाहने अस्ताव्यस्त लावली जात असल्यामुळे अन्य वाहनांना ये-जा करताना तारेवरीची कसरत करावी लागते़ याकडे कोणाचेही लक्ष नाही़
बारा पत्थर चौकाच्या अलिकडे तहसील कचेरी आणि लगतच पाच कंदिलचा परिसर येतो़ साहजिकच या चौकातून येणाºया जाणाºया वाहनधारकांची संख्या तशी दिवसा प्रचंड प्रमाणात असते़ शिवाय याच भागात लहान-मोठे व्यावसायिक असल्याने नागरीकांची देखील याच ठिकाणी वर्दळ पाहावयास मिळते़ अवैध पार्किंग होत असल्यामुळे रस्त्यावरुन वाहन चालविताना एकप्रकारची तारेवरची कसरत करावी लागते़ काहीवेळेस आपापसात वादाच्या देखील घटना घडत असतात़ अवैध पार्किंगची समस्या वेळीच सोडविली नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ परंतु याच समस्यांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे समोर येत आहे़