वाहतूक नियंत्रकाचे लांबविले एक लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:29 PM2019-03-15T22:29:19+5:302019-03-15T22:29:41+5:30
यावल-वापी बसमधील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : यावल-वापी या बस मध्ये कुसुंबा येथून वाहतूक नियंत्रक अंकुश जिरे हे साक्री येथे येत असताना बसमध्येच त्यांच्या खिशातील एक लाख रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.
एमएच २० बीएल २४०५ क्रमांकाची यावल आगाराची बस ही वापीकडे जात असताना कुसुंबा येथील अंकुश संतोष जिरे हे बसमधे प्रवास करत होते. त्यांच्या पँटच्या खिशातील एक लाख रुपये रोख चोरीस गेल्याचे साक्री बस स्थानकावर उतरतांना त्यांच्या लक्षात आले. जिरे हे साक्री आगारात वाहतूक नियंत्रक या पदावर कार्यरत असून बँकेतून कर्ज घेऊन उसनवारीने घेतलेले पैसे परत करण्यासाठी जात असतांना ही घटना घडली आहे. साक्री बस स्थानक आवारात पोलिसांनी प्रवाशांची तपासणी केली. तथापी रक्कम मिळून आली नाही. साक्री शहरात बसने प्रवेश केल्यावर बसला दोन थांबे आहोत. या दोन्ही ठिकाणी काही तरुण उतरल्याने त्याच्यावर संशयाची सुई आहे. या चोरी संदर्भात अंकुश जिरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.