दिवसात ३५ वेळा असते ‘रेल्वे फाटक’ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:56 AM2019-06-12T11:56:40+5:302019-06-12T11:57:04+5:30
दोंडाईचा रेल्वे स्टेशन : शहराजवळील रेल्वे फाटकवर उड्डाणपूल उभारण्याची नागरिकांची मागणी
दोंडाईचा : सुरत - भुसावल पश्चिम रेल्वे मार्गावरील दोंडाईचा रेल्वे स्टेशनचे दोन्ही रेल्वेफाटक प्रवाशी तसेच मालवाहतूक गाड्याचा ये - जा मुळे वारंवार बंद केले जात असल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. साधारणत: दिवसातून ३५ वेळेस फाटक बंद होत असल्याने वाहनधारकासाठी रेल्वे फाटक डोकेदुखी ठरत असल्याचे बोलले जाते. याठिकाणी उड्डाण पुल उभारण्याची मागणी परिसरात राहणाºया नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
या रेल्वे मार्गावर गर्ल्स स्कूल जवळ व शहराचा बाहेर दोंडाईचा-शिंदखेडा रस्त्यावर असे दोन रेल्वे फाटक आहे. गर्ल्स स्कूल जवळील गेट चा उत्तरेला सिंधी बांधवांसह, डालडा घरकुल आहे. त्यामुळे येणाºया जाणाºयाची नेहमी वर्दळ असते. याच रेल्वेमार्गावर दोंडाईचा नजीक दोंडाईचा -शिंदखेडा रस्त्यावर रेल्वे फाटक आहे. रेल्वेचा ये - जा सुरु असल्याने रेल्वे फाटक बंद असते. त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागते.
दिवसात ३५ वेळा बंद
सुरत - भुसावळ रेल्वे मार्गावरुन दररोज ३५ रेल्वे जातात. म्हणजेच दिवसातून ३५ वेळा हे रेल्वे फाटक बंद असते. त्यामुळे रेल्वे फाटकाच्या पलिकडे राहणाºया नागरिकांना याचा त्रास होतो. नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागते. दररोजच्या या त्रासाला नागरिक कंटाळले आहे. याठिकाणी उड्डाणपूल करण्याची मागणी परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्ष पासूनची मागणी अजूनही प्रलंबितच आहे. याकडे कोणीच आजपर्यंत गांभीर्याने बघितले आहे, असे वाटत नाही.रेल्वे प्रशासनाने याकडे आतातरी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. कारण आता शहरातील लोकसंख्या वाढत आहे. या रस्त्यावरील वर्दळही वाढली आहे. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे आतातरी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.