स्वच्छ सर्वेक्षणकरीता सफाई कर्मचा-यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:22 PM2018-12-16T17:22:54+5:302018-12-16T17:24:21+5:30

प्रशिक्षणात एकूण ९० सफाई कर्मचारी यांची उपस्थित

 Training to the cleaning staff for implementation of Clean Survey 2019 | स्वच्छ सर्वेक्षणकरीता सफाई कर्मचा-यांना प्रशिक्षण

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून त्या संदर्भात सफाई कर्मचाºयांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले़ नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेतील सफाई कर्मचाºयांना शिरपूर वरवाडे नगरपरिषद व सोशल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. धुळे जिल्हात प्रथमच एनएसडीसी यांच्या मार्गदर्शनानुसार सफाई कामगार यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण दरम्यान वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर, रस्ते, बगिचे आणि इमारती यांची स्वच्छता करणे. ओला सुका कचरा विलगीकरण समूहात काम कसे करावे. याबाबत सोशल लॅब संस्थेचे समन्वयक कुणाल ठाकूर आणि प्रकाश पठाडे यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणात एकूण ९० सफाई कर्मचारी यांची उपस्थित होते़
या प्रशिक्षण कार्यक्रमात ज्या सफाई कर्मचाºयांना २० ते २५ वर्षे काम करण्याचा अनुभव आहे, अशा सफाई कर्मचाºयांचा गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. 
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, सफाई कर्मचारी हे खरे स्वच्छतादूत असून त्यांनी स्वच्छता करताना वैयक्तिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांनी देखील सफाई कर्मचारी हे मेहनतीने सफाईचे काम करतात म्हणून शिरपूर शहर स्वच्छ सुंदर रहाण्यास मदत होते.
कार्यक्रमास नगरसेवक संदीप शिरसाठ, नगरसेवक गणेश सावळे, नोडल आॅफिसर सागर कुळकर्णी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके, समुदाय संघटक प्रमोद अहिरे, श्रीजी इवेंट मॅनॅजमेन्टच्या प्रकल्प समन्वयक सुषमा पवार, पौर्णिमा पाठक, घनकचरा व्यवस्थापक प्रकल्प समन्वयक सागर निळे व प्रकाश चव्हाण, राजेंद्र पाटोळे, घंटागाडी सुपरवायझर प्रविण रणदिवे, अन्वर शेख तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते़

Web Title:  Training to the cleaning staff for implementation of Clean Survey 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे