भाजीपाला क्रेटमधून दारूची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:06 PM2020-05-11T21:06:44+5:302020-05-11T21:29:12+5:30
शिरपूर : सव्वा लाखाच्या दारूसह मालेगावचे दोनजणांना घेतले ताब्यात
शिरपूर : भाजीपाला भरण्याच्या क्रेटमध्ये अवैधरित्या दारुचा साठा घेऊन जाणाºया पिकअप व्हॅनला शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले़ ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे़ १ लाख १२ हजाराच्या दारुसाठा, ५ लाखांची पिकअप व्हॅनसह मालेगाव येथील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले़
मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दहिवद पोलिस चौकीजवळ सांगवी पोलिसांनी नाकाबंदी केली होती़ सांगवीकडून येणारी एमएच ४१ एयू १५६७ क्रमांकाची पिकअप व्हॅन आल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता गाडीतील भाजीपाल्याचे रिकाम्या प्लॉस्टीक क्रेटखाली लपवलेले दारूचे खोके दिसून आले़
गाडीच्या तपासणीत १ लाख १२ हजार ३२० रूपये किंमतीची देशी दारूचे ४५ खोके मिळून आलेत़ तसेच गाडीची किंमत ५ लाख रूपये, दीड हजाराचे क्रेट असा एकूण ६ लाख १२ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ चालकासह साथीदाराला जेरबंद करण्यात आले आहे़ मात्र त्या इसमाने गाडी घेवून दारू भरवून दिली तो इसम कोण या संदर्भात सांगवी परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे़
पोलिस अधिक्षक चिन्मय पांडे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक पाटील, हवालदार लक्ष्मण गवळी, संजीव जाधव, योगेश दाभाडे, नियाज शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली़ याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़
दरम्यान, मालेगांव येथील गाडी चालक सुनिल प्रकाश मगर (२८) व त्याचा साथीदार सुधीर हिरामण पवार (२१) हे दोघे टॅमाटो विकण्यासाठी मध्यप्रदेशात गेले होते़ ते विकून ते ९ रोजी संध्याकाळच्या सुमारास सांगवी गावाजवळ आले असतांना त्यांना मालेगाव येथील एकाचा मोबाईल आला़ चालक व साथीदार हे दोघे तेथे उतरून त्यांनी आलेल्या मोबाईल संभाषण प्रमाणे गाडी दुसºयाच्या ताब्यात देवून तेथेच थांबायला सांगितले़ अवघ्या एका तासानंतर सांगवी येथील एका अज्ञात व्यक्तीने त्या दोघांना गाडी ताब्यात देवून निघण्यास सांगितले़ नेमकी गाडी एक तास कुठे गेली? हे मात्र संबंधित चालकाला सांगता आले नाही़ गाडीत काय भरले हे देखील त्याला समजले नसल्याचे सांगण्यात आले़