कचराकुंडीचा ‘कचरा’ रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:13 PM2019-04-24T22:13:58+5:302019-04-24T22:14:40+5:30
महापालिका : शहरात स्वच्छता अभियानाचे तीनतेरा, घंटागाडीच्या तक्रारीत वाढ
धुळे : स्वच्छ भारत अभियानात महापालिका क्रमांक मिळविण्यासाठी महास्वच्छता अभियानातुन शहरात स्वच्छता केली जात आहे़ तर दुसरीकडे मात्र कचराकुंडीत जमा झालेला कचऱ्याची विल्हेवाट होत नाही़ त्यामुळे शहरात कचराकुंडीचा कचरा झालेला दिसुन येत आहे़
प्रश्न सोडविण्याची गरज
कचरा संकलनासाठी शहरात ठिक-ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत़ मात्र संकलन करण्यात आलेल्या कचऱ्यांची विल्हेवाट होत नाही़ कचराकुंडीच्या आवारात मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्याचा उपद्रव तसेच कचरा कुंडीच्या परिसरात मोकाट गुरांमुळे वाहतुकीची कोंडी होते़ कचरा संकलनासह मोकाट गुरांच्या प्रश्न सोडविण्याची गरज आहे़
आरोग्य धोक्यात
खराब भाजीपाला, घरातील कचरा, प्लॉस्टिक पिशव्या, रद्दी, ओला- सुका जमा झालेला कचरा कचराकुंडीत टाकला जातो़ मात्र कचराकुडी भरल्यानंतर चार ते पाच दिवस तशीच पडून राहिल्याने परिसरात दुर्गधी होते़ त्यामुळे स्थानिक रहिवाशांना अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्या सामोरे जावे लागु शकते़
घनकचरा व्यवस्थापनास ‘ब्रेक’
शहरातून संकलित होणाºया कचºयावर प्रक्रिया करण्यासह पाच महिन्यापासुन ७९ घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत़ त्यासाठी नाशिक येथील कंपनीला ठेका देखील देण्यात आला आहे़ मात्र नियोजना अभावी नागरिकांचे प्रश्न सोडविता येवू शकले नाही़
जबाबदारी सोपविण्याची गरज
शहराचा सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिकाच्या घंटागाड्यांवर ‘जीपीएस’ प्रणाली, सफाई कर्मचाºयांची बायोमेट्रिक हजेरी, कचरामुक्तीसाठी टोल फ्री नंबर, मोबाइल अॅप यांसारखे उपक्रम राबविण्याची गरज आहे़ त्यासाठी शहरातील रस्ते, साफसफाई, गटारी, खुल्या जागेतील कचरा कुंड्यांची जबाबदारी सोपविण्याची गरज आहे़
कचरा डेपोचा प्रश्न अंधारात
वरखेडी कचरा डेपो व गांडूळ खत प्रकल्पाची जागेत वर्षानुवर्षे साठविण्यात आलेल्या कचºयावर प्रक्रिया करण्यात येणार आहे़ त्यामुळे कचºयाचे नियमित संकलन व प्रक्रिया करणे महापालिकेला शक्य होणार आहे़ मात्र, आचार संहितेमुळे कचरा डेपोचाही प्रश्न रखडलेला दिसुन येत आहे़
प्रशासनाचा मानस
आतापर्यंत पाचवेळा राज्यात यश मिळाले आहे़ यापुढील टप्प्यात स्वच्छता व कचरा संकलन आणि प्रक्रियेचा प्रश्न मार्गी लावून त्यातही यश मिळविण्याचा मानस असल्याचे अपेक्षा मनपाकडून वर्तविण्यात आली ंआहे़ असे असताना मात्र काही भागात घंटागाडी फिरकत नसल्याने कचरामध्ये वाढ झाली आहे़