आदिवासी समाजाचा मोर्चा
By admin | Published: April 28, 2017 12:53 AM2017-04-28T00:53:51+5:302017-04-28T00:53:51+5:30
आदिवासी क्रांती मोर्चा समिती : जिल्हाधिका:यांना निवेदन
धुळे : आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी व समाजावर होणारे अन्याय थांबविण्याच्या मागणीसाठी आदिवासी क्रांती मोर्चा समितीच्या वतीने गुरुवारी दुपारी शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले.
शासनाच्या आदिवासी समाजाबद्दलच्या उदासीनतेकडेही या माध्यमातून लक्ष्य वेधण्यात आले. शासनाने अॅट्रॉसिटी कायद्याची योग्य ती अंमलबजावणी करावी, आदिवासी विद्याथ्र्याना त्यांच्या शिक्षणाचा योग्य हक्क मिळावा. महिलांवर व मुलींवर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार थांबावेत, स्वातंत्र्यापासून आदिवासी समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. साक्री तालुक्यातील शेवडीपाडा येथील सामूहिक अत्याचार, दोंडाईचा येथील सात वर्षीय मुलीवर झालेला अन्याय-अत्याचार घटनेतील नराधमांना भरचौकात फाशी द्यावी, आदिवासी आरक्षणावर बोगस आदिवासींनी नोक:या बळकावल्या आहेत. अशा लोकांची चौकशी करून त्यांनी घेतलेल्या वेतनाची वसुली करावी. आदिवासींच्या दफनभूमीसाठी शासनाकडून जागा उपलब्ध करून देण्यात यावी, आदिवासींना मासेमारीसाठी पाझर तलाव, धरणे, गावतलाव देण्यात यावे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्राचे एकत्रीकरण करून स्वतंत्र आदिवासी भिलीस्थान राज्य निर्मिती करावी.
रानमळा येथील समस्या सोडवा
धुळे तालुक्यातील मौजे रानमळा येथील आदिवासी भिल्ल समाज गेल्या शंभर वर्षापूर्वीपासून गायरान गावठाण जमिनीवर झोपडय़ा बांधून राहत आहे. काही लोक जबरदस्तीने यावर ताबा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही जागा त्वरित आदिवासींच्या नावावर करावी, अशीही मागणी करण्यात आली. मोर्चामध्ये अशोक धुलकर, डोंगर बागुल, जीवन चव्हाण, संजय मरसाळे, दीना उघाडे, संदीप पाटोळे, दिनेश आटोळे, जयसिंग ठाकरे, सुभाष मोरे व आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.