उन्हाच्या तडाख्यातही आदिवासींचा उत्साह कायम
By admin | Published: March 13, 2017 01:11 AM2017-03-13T01:11:54+5:302017-03-13T01:11:54+5:30
भोंग:या उत्सवाचा समारोप : रोहिणी येथे रंगला भोंग:या; पाच लाखांहून अधिक उलाढाल; नवागाव येथे मेलादा उत्सव
शिरपूर : उन्हाच्या तडाख्यातही शिरपूर तालुक्यातील रोहिणी येथे रविवारी आयोजित भोंग:या उत्सवात आदिवासी बांधवांमध्ये उत्साह दिसून आला. धूलिवंदनाच्या पूर्वसंध्येला रंगलेल्या या उत्सवात सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बांधवांची प्रचंड गर्दी झाली होती. सायंकाळी उशिरार्पयत चाललेल्या या उत्सवात पाच लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल झाली. दरम्यान, शिरपूर तालुक्यात आयोजित भोंग:या उत्सवाचा समारोप झाला असून नवागाव येथे शनिवारपासून मेलादा उत्सवाला सुरुवात झाली आहे.
रविवारी रोहिणी गावाचा आठवडा बाजाराचा दिवस होता. त्यामुळे 12 रोजी भोंग:या बाजार भरला. उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींसाठी हा बाजार म्हणजे आनंद द्विगुणित करून व्यक्त करण्याचे मोठे ठिकाण आहे. तरुणांमधील सळसळता उत्साह आणि आदिवासी संस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन घडविणा:या येथील भोंग:या बाजारात यंदा परिसरातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती. पांरपरिक कार्यक्रम सादर करीत जल्लोषात भोंग:या बाजाराची सांगता झाली.
रोहिणीत मिरवणूक
रविवारी रोहिणी गावात आयोजित भोंग:या उत्सवात आदिवासी तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. या वेळी त्यांनी केलेल्या चित्तवेधक वेशभूषेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हीना गावीत, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, आमदार डॉ. विजयकुमार गावीत उपस्थित होते.
होळी, धूलिवंदनाचा उत्साह
आदिवासी समाजात होळी या सणाला विशेष महत्त्व आहे. रविवारी होळी सण असल्यामुळे आदिवासी बांधवांचा सकाळपासूनच उत्साह दिसून येत होता. तसेच सोमवारी धूलिवंदन असल्यामुळे आदिवासी बांधवांनी उत्सवात सहभागी झालेल्या बांधवांना रंग लावून या उत्सवाचा शोभा आणखीनच वाढविली. या वेळी काही आदिवासींनी त्यांच्यातील पारंपरिक कलाविष्कार सादर करत सर्वानाच थक्क करून सोडले.
होळीनंतर फाग उत्सव सुरू होणार
होळीनंतर फाग गोळा करण्यासाठी पावरा जमातीतील पुरुष गावात फिरतात़ यातून जमा झालेल्या रकमेतून बोकड विकत घेऊन त्यांचे मांस फागसाठी वर्गणी दिलेल्या लोकांकडे घरोघरी दिले जाण्याची प्रथा आजही टिकून आह़े गावातील बांधव एकत्रितरित्या हा कार्यक्रम साजरा करतात़ यास गुट असेही म्हणतात़ आदिवासी बांधव तब्बल या 15 दिवसात भोंग:या, होळी, मेलादा व फाग असे उत्सव साजरे करतात़
शिमगा ङोलण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी
4शिरपूर तालुक्यातील नवागाव येथे शनिवारी होळी पेटविण्यात आली. त्यानंतर रविवारी पहाटे होळीचा शिमगा ङोलण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. शिमगा ङोलल्यानंतर होळीला प्रदक्षिणा घालून हा सण उत्साहात साजरा केला. तर ज्यांनी विस्तवावर चालण्याचा नवस केला होता. त्यांनी तो नवस फेडला. या वेळी येथील तरुणांनी गे:या, रिसडा, निचक्याची वेशभूषा करून नृत्य सादर केले.
भोंग:या उत्सवाचा थाटात समारोप
4रविवारी शिरपूर तालुक्यातील रोहिणीसह, सेंधवा, पानसेमल, बडवानी, चेरवी, पोखल्या, इंद्रपूर येथे भोंग:या उत्सवाचा समारोप झाला.