धुळ्यात महिलांनी मागितली व्यापाºयाकडे खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 05:09 PM2017-11-30T17:09:09+5:302017-11-30T18:25:03+5:30

अश्लिल फोटो : चौघांविरुध्द गुन्ह्याची नोंद

Tribute to women demanded in Dhule | धुळ्यात महिलांनी मागितली व्यापाºयाकडे खंडणी

धुळ्यात महिलांनी मागितली व्यापाºयाकडे खंडणी

Next
ठळक मुद्देधुळ्यातील महिलांचा अजब प्रकारपोलिसांची तात्काळ कारवाई दोघा महिलांसह दोन साथीदारांवर गुन्हा टार्गेट करुन खंडणी मागणाºया टोळीचा फर्दाफाश

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील पाचकंदिल चौकातील शंकर मार्केटमधील दुकानात घुसून व्यापाºयासोबत दोघा महिलांनी जबरदस्तीने अर्धनग्न फोटो काढले़ बदनामी करण्याची धमकी देत दोन लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला़ याप्रकरणी दोन महिलांसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, त्या दोघा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ 
पाचकंदिल चौकात जय शंकर मार्केटमधील दुकान नंबर १०२ चे मालक महेंद्र निरंजनदेव रेलन (६१) हे दुकानात असताना मनिषा रविंद्र माळी (रा़ सोमेश्वर विद्यानगर, सोनगीर) आणि अनिता उर्फ जयश्री प्रकाश पवार (रा़ गणेश कॉलनी, साक्री रोड, धुळे) या दोघी महिला दुकानात आल्या़ त्यांनी कपडे घेण्याचा बहाणा करुन व्यापारी रेलन यांना तळमजल्यात नेले़ त्यानंतर अगोदरपासूनच तेथे दबा धरुन बसलेले त्या महिलांचे साथीदार रोशन देविदास समनधिर (रा़ आंबेडकर नगर, नकाणे रोड, धुळे) आणि दादू (पूर्ण नाव माहित नाही) हे लागलीच दुकानात शिरले़ त्यांनी व्यापाºयाला पकडून अर्धनग्न करुन जबरदस्तीने महिलांसोबत फोटो काढून घेतले़ या चौघांनी वृध्द व्यापारी रेलन यांना शिवीगाळ करीत तुमचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो समाजात दाखवून तुमची बदनामी करु़ या बदल्यात आम्हाला दोन लाख रुपये द्या, अशी धमकी देत खंडणी मागितली़ हा प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडला़ या घटनेनंतर रेलन यांनी ही बाब पोलिसांनी कळविली़ लागलीच उपनिरीक्षक नाना आखाडे, विनोद आटोळे, मिलींद सोनवणे, हिरालाल बैरागी, महिला हवालदार कुंवर यांनी घटनास्थळ गाठले़ मनिषा आणि अनिता या दोघींना ताब्यात घेतले़ मात्र त्यांचे साथीदार तेथून पळून जाण्यास यशस्वी ठरले़ 
याप्रकरणी महेंद्र रेलन यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयित या चौघांविरुध्द बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास भादंवि कलम ३८४, ५४१, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद आटोळे पुढील तपास करीत आहेत़ 
व्यापारी व अधिकारी यांना टार्गेट करुन त्यांच्याकडून खंडणी मागणाºया टोळीचा फर्दाफाश झाला आहे़ 

 

Web Title: Tribute to women demanded in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.