ट्रकचालकांचा पार्किगवरून पोलिसांशी वाद, तणाव

By admin | Published: March 22, 2017 11:49 PM2017-03-22T23:49:29+5:302017-03-22T23:49:29+5:30

चाळीसगाव रोड : जमाव पांगविण्यासाठी सौम्य लाठीहल्ला

Troubles with the police on parking truck drivers, tension | ट्रकचालकांचा पार्किगवरून पोलिसांशी वाद, तणाव

ट्रकचालकांचा पार्किगवरून पोलिसांशी वाद, तणाव

Next


धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुलीवर पेट्रोलिंग दरम्यान बुधवारी सायंकाळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक व ट्रकचालकांमध्ये वाद झाला़ त्यातून तणाव निर्माण झाल्याने जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीहल्ला करण्यात आला़  याबाबत रात्री उशिरार्पयत मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होत़े
मुंबई-आग्रा महामार्गावर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक देवरे व कर्मचारी  बुधवारी सायंकाळी  पेट्रोलिंग करीत असताना त्यांना चाळीसगांव चौफुली येथे काही ट्रक रस्त्यावर उभ्या असल्याचे आढळून आले. या वेळी  एका ट्रकचालकाने त्यांच्याशी  ‘नो पार्किग’चा  फलक कुठे आहे, दंड आकारा असा वाद घातला. 
 ट्रकमालक हरीश विभुते व इतरही ट्रकचालक गोळा झाल्याने देवरे यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. काही वेळातच फौजफाटा दाखल झाला. तोपयर्ंत तेथे ट्रकचालकांची गर्दी वाढल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीहल्ला करण्यात आला़ या वेळी हरीश विभुते यांना काठीचा मार लागला. हरीश विभुतेना  खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. लाठी चार्ज झाला नाही केवळ जमा पांगविण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव यांनी सांगितल़े
देवरेंवर गुन्हा दाखलची मागणी
पोलीस निरीक्षक अशोक देवरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही ट्रकचालक व मालकांनी रात्री उशिरा मोहाडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्याचे कळते.
सात ते आठ जणांविरुध्द गुन्हा
पोलीस निरीक्षक अशोक देवरे यांच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिसात रात्री उशिरा सात ते आठ जणांविरुध्द मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े त्यात हरीश विभुते, पवन विभुते, योगेश कढरे, नीलेश प्रकाश विभुते व इतर तीन ते चार जणांचा समावेश आह़े

Web Title: Troubles with the police on parking truck drivers, tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.