धुळे : ट्रक-बसचा अपघात बसचालकासह १० ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 12:00 AM2019-08-19T00:00:40+5:302019-08-19T07:21:35+5:30
अपघातात कंटेनरने चालकच्या साईडने बसला जोरदार धडक दिली. त्यात बसचा चक्काचूर झालेला आहे.
धुळे : दोंडाईचा - निमगुळ रस्त्यावर रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद - शहादा बस आणि कंटेनर यांची धडक झाली. अपघातात बसचालक मुकेश पाटील यांच्यासह १० जण जागीच ठार झाले आहेत. तर २० जखमी असून पैकी ६ गंभीर आहेत. अपघातात कंटेनरने चालकच्या साईडने बसला जोरदार धडक दिली. त्यात बसचा चक्काचूर झालेला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते निमगुळ रस्त्यावर औरंगाबादकडून शहादाकडे जाणारी एमएच २० बीएल ३७५६ क्रमांकाची बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. अपघाताची ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास निमगुळपासून साधारण ३ किमी अंतरावर घडली.
अपघाताताची माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी निमगुळ ग्रामस्थांनी धाव घेतली. शहादा आगाराचे बसचालक मुकेश पाटील हे जागीच ठार झाले आहेत. बसमधील जखमी झालेल्या २० प्रवासींना मदत करीत रुग्णवाहिकेने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे काम वेगाने सुरु आहे. या अपघातात ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. डॉ. सचिन पारख आणि डॉ. ललित चंद्रे जखमींवर उपचार करीत आहेत. दरम्यान, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य वेगाने सुरु आहे.