सीमा तपासणी नाक्यावर 21 म्हशीची निर्दयपणे वाहतूक करणारा ट्रक पकडला
By admin | Published: April 26, 2017 01:09 PM2017-04-26T13:09:48+5:302017-04-26T13:09:48+5:30
म्हशींची निर्दयपणे वाहतूक करणा:या ट्रकला मंगळवारी पहाटे शिरपुर तालुका पोलिसांनी मुंबई- आग्रा महामार्गावरील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर पकडल़े
Next
धुळे,दि.26- म्हशींची निर्दयपणे वाहतूक करणा:या ट्रकला मंगळवारी पहाटे शिरपुर तालुका पोलिसांनी मुंबई- आग्रा महामार्गावरील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर पकडल़े ट्रकमध्ये 21 म्हशी आढळून आल्या़ याप्रकरणी चार जणांविरूध्द शिरपुर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े
ट्रकमध्ये (एमपी 09 एचएच 3286) 21 म्हशींची निर्दयपणे व विनापरवाना वाहतूक होत होती़ पोलिसांनी 1 लाख 20 हजारांच्या आठ ते दहा वर्षाच्या 21 म्हशी व 15 लाख रूपये किंमतीचा ट्रक ताब्यात घेतला आह़े याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक मोहंमद जाकीर मोहंमद रशिद मन्सुरी (रा़ अलीपुर ता़ आष्टा जि़ सिहोर, मध्यप्रदेश), सह चालक छोटा मंन्तु अन्सारी (रा़ काजीपुरा मोहल्ला जि़ आष्टा), इसाक रहीम शेख (रा़ वरणगाव ता़ भुसावळ), टिपु उर्फ साजी शाहीद अन्सारी (रा़ आष्टा गोया मोहल्ला ता़ आष्टा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.