ट्रकची कारला धडक, मालेगाव येथील दोघे जागीच ठार

By admin | Published: April 14, 2017 05:00 PM2017-04-14T17:00:14+5:302017-04-14T17:00:14+5:30

थांब्यावर उभ्या बसला ओव्हरटेक करणा:या कारला समोरून येणा:या भरधाव ट्रकने धडक दिल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाल़े

The truck's car hit two people on Malegaon | ट्रकची कारला धडक, मालेगाव येथील दोघे जागीच ठार

ट्रकची कारला धडक, मालेगाव येथील दोघे जागीच ठार

Next

 धुळे,दि.14 : थांब्यावर उभ्या बसला ओव्हरटेक करणा:या कारला समोरून येणा:या भरधाव ट्रकने धडक दिल्याने  कारमधील दोन जण जागीच ठार झाल़े हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सुरत- नागपूर महामार्गावरील अजंग गाव शिवारात घडला आह़े अपघातात कार चक्काचुर झाली आह़े तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आह़े  दरम्यान अपघातानंतर वाहतूक ठप्प झाली होती़ 

दिलीप सोपान पिंगळे (वय 52) व विनायक राधेश्याम शर्मा (वय 42)  रा़ मालेगाव अशी दोघा मयतांची नावे आहेत़ दोघे 14 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कारने (एमएच 12 एफके 4568) धुळ्याहून जळगावकडे जात असतांना अजंग गाव शिवारात बस थांब्यावर बस थांबलेली होती़ त्यामुळे दिलीप पिंगळे यांनी कार ओव्हरटेक केली़ त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणा:या ट्रकने (क्ऱ आरजे 19 ईएफ 7118) जोरदार धडक दिली़ कारला काही अंतरार्पयत ओढत नेल़े त्यात कारमधील दोघे जागीच ठार झाल़े त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केल़े मयत दिलीप पिंगळे हे मालेगाव येथील भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस होत़े त्यांची ऑईल मिल आह़े तसेच विनायक शर्मा हे देखील व्यापारी होत़े 

Web Title: The truck's car hit two people on Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.