एटीएम कोड विचारून दोघांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2017 12:21 AM2017-04-27T00:21:14+5:302017-04-27T00:21:14+5:30

धुळे व निजामपूर : बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी

Try both ATM and ATM codes | एटीएम कोड विचारून दोघांना गंडा

एटीएम कोड विचारून दोघांना गंडा

Next

धुळे/निजापपूर : भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून एटीएमचा कोड मिळवून शहरातील एकासह निजामपुरातील शेतक:यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने परस्पर पैसे काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े त्यात एकाच्या खात्यातून 40, तर दुस:याच्या खात्यातून 85 हजार काढण्यात आल़े याप्रकरणी शहर व निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
शहरातील साक्री रोडवरील श्रीहरी सोसायटीत राहणारे व मिस्तरी काम करणारे दिलीप रतन मिस्तरी यांना गेल्या शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या भ्रमणध्वनीवर 9073296356 या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला़ त्याने आपण बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून मिस्तरी यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची व एटीएम कोडची माहिती विचारून घेतली़ त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 39 हजार 997 रुपयांची ऑनलाइन खरेदी केली़ आपली फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिलीप मिस्तरी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल करीत आहेत़
दुस:या घटनेत साक्री तालुक्यातील छडवेल येथील शेतकरी नाना सदाशिव साळुंखे यांना  भ्रमणध्वनीवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला़ स्टेट बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून तुमचे एटीएम कार्ड बंद होणार असे सांगून पासवर्ड विचारला़ त्यानंतर त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून 14 ते 15 एप्रिल या दोन दिवसात एकूण 85 हजार रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक केली. साळुंखे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आह़े

Web Title: Try both ATM and ATM codes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.