बोराडी येथील स्टेट बँक शाखा दुसºयांदा फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:00 PM2017-11-26T12:00:45+5:302017-11-26T12:03:22+5:30
शिरपूर : मुख्य दरवाजा तोडण्याच्या प्रयत्नात सायरन वाजला
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांकडून बॅँक फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडण्याच्या प्रयत्नात बँकेतील सायरन वाजल्यामुळे चोरटे तेथून पसार झाले़ गेल्या आॅगस्ट महिन्यात सुध्दा अशाचप्रकारे ही बँक लुटण्याचा प्रयत्न झाला होता़ मात्र त्यावेळी चोरटे बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले होते. मात्र तरीही त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही़
बोराडी-शिरपूर रस्त्यावरील बसस्थानकाजवळ स्टेट बँकेच्या शाखेत शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाची दिशा बदलून चॅनेल गेटचे कुलूप कटरने तोडले़ मात्र मुख्य दरवाजाचे कुलूप कटरने तोडताना बँकेत लावलेला धोक्याचा सायरन वाजल्यामुळे चोरटे घाबरले अन् सायरन स्पीकर तोडून बाजूला फेकून देत चोरटे पसार झाले. त्यांनी तोडलेले कुलूप जवळील गाईच्या गोठ्यात तर सायरनचा स्पीकर बाजूच्या ओट्यावर मिळून आला़
बँकेचे फिल्ड आॅफिसर बोरसे हे शनिवारी सकाळी ९ वाजता बँकेत आले, तेव्हा त्यांना बँकेचे कुलूप तोडलेले दिसले़ त्यांनी लागलीच बँकेच्या वरिष्ठांना याबाबत कळविले़ घटनेची वार्ता बोराडी गावात समजताच अनेकांनी बॅँकेजवळ गर्दी केली़ घटनेची माहिती सांगवी पोलिसांना दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तत्काळ भेट दिली़ त्यावेळी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र पुराना दरवाजापर्यंत जावून श्वान घुटमळत राहिला.
त्यामुळे चोरटे पुराना दरवाजापासून गाडीत निघून गेल्याचा अंदाज लावला जात आहे़ बोराडी येथील या बँकेतून काहीच चोरीस न गेल्याचे बँकेच्या अधिकारी व पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले़ बँकेत चोरी करण्याचा प्रयत्नाचा अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे़
दुसºयांदा घडली घटना
यापूर्वी, गेल्या १९ आॅगस्टच्या मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास ३-४ चोरट्यांनी बँकेच्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाची दिशा बदलून बँकेच्या बाहेर लावलेल्या सायरनची वायर कापून टाकल्यानंतर बँकेचे कुलूप तोडून प्रवेश मिळविला़ चोरट्यांच्या बँकेत प्रवेश करतांना बँकेच्या आतील कॅमेºयात ३-४ चोरटे घुटमळत असल्याचे कैद झाले आहे़ त्यानंतर एकाने सीसीटीव्ही कॅमेºयांचे कनेक्शन बंद केल्याचे कैद झाले आहे़ त्यानंतर चोरट्यांनी बँकेच्या कॅश रूममध्ये जावून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्याकडून तिजोरी न उघडल्याने ते रागाने कागदपत्रे अस्तावस्त फेकून निघून गेले होते.