जळोद धरणातील गाळ काढण्यासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:24 PM2018-12-11T22:24:10+5:302018-12-11T22:24:34+5:30
भूपेशभाई पटेल : तºहाडकसेब येथील आरोग्य शिबीरात ५२८ रूग्णांची डोळे तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील जळोद धरणातील व इतर प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना भेटून प्रयत्न केले जातील. त्यातील गाळाचा उपयोग देखील शेतकरी बांधवांना शेतीसाठी करुन घेता येईल, असे सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांनी विकास योजना आपल्या दारी अभियानप्रसंगी केले़
तºहाडकसबे येथे आर.सी.पटेल मेडिकल फाऊंडेशन, शिरपूर तालुका युवक काँग्रेस, शंकरा आय हॉस्पीटल यांच्यावतीने ७२ वे आरोग्य शिबीर तसेच विकास योजना आपल्या दारी अभियानचे उद्घाटन प्रियदर्शिनी सूतगिरणी चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी भूपेशभाई पटेल म्हणाले, सर्वांनी आपल्या आई -र् वडीलांचा व मोठयांचा नेहमीच सन्मान करावा, त्यांची सेवा करावी. त्यांच्या रुपाने घरातच देव आहेत असे देखील त्यांनी सांगितले़
यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, तºहाडकसबे सरपंच चित्राबाई भिल, बाजार समिती उपसभापती इशेंद्र कोळी, माजी संचालक ओंकार पाटील, सूतगिरणी संचालक धनंजय पाटील, वरुळ उपसरपंच नवेश मराठे, सूतगिरणी माजी संचालक शिवाजी धनगर, मांडळचे माजी सरपंच भटू माळी, राजेंद्र पाटील, सुभाष पाटील, माजी सरपंच दुल्लभ कोळी, ग्रामविकास शैक्षणिक संस्थेचे चेअरमन हिंमतसिंग गिरासे, जयवंत पाडवी, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते़ शिबीरात ३१३ महिला व पुरुष तसेच युवा वर्गाची डोळे तपासणी करण्यात आली. यांपैकी तब्बल ७९ जणांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अनेक जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.