कुकरमुंडा येथील हनुमानाची मूर्ती तुलसीदासांनी दिलेला प्रासादिक ठेवा
By admin | Published: April 11, 2017 03:34 PM2017-04-11T15:34:33+5:302017-04-11T15:34:33+5:30
कुकरमुंडा येथील राममंदिर संस्थानात तुलसीदासांनी हनुमान मूर्ती भेट दिली होती़ हा भक्तीचा ठेवा आजही अत्यंत चांगल्या स्थितीत आह़े
Next
400 वर्षाची परंपरा : महाराष्ट्र व गुजराथ राज्यातील भाविकांचे नाते होतेय बळकट
नंदुरबार,दि.11- रामचरितमानस, दोहावली आणि हनुमान चालिसा यासारख्या साहित्याची रचना करणा:या संत तुलसीदास यांचा आणखी एक ठेवा नंदुरबार जिल्ह्यापासून काही अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील कुकरमुडा येथे आजही अबाधित आह़े कुकरमुंडा येथील राममंदिर संस्थानात तुलसीदासांनी हनुमान मूर्ती भेट दिली होती़ हा भक्तीचा ठेवा आजही अत्यंत चांगल्या स्थितीत आह़े
गुजरात राज्यातील कुकरमुंडा हे गाव संत खंडोजी महाराजांचे समाधीस्थळ म्हणून सर्वश्रुत आह़े गुजरात आणि खान्देशात वैैष्णवांचे श्रद्धास्थान म्हणूनही खंडोजी महाराजांचे नाव घेतले जात़े याच खंडोजी महाराजांच्या कुकरमुंडा या गावी, साधारण 400 वर्षापूर्वी निवास करणारे संत जसवंत स्वामी हे काशी येथे गेले असता, त्याठिकाणी त्यांची आणि संत तुलसीदास यांची भेट झाली़ या भेटीदरम्यान दोघांमध्ये ब:याच विषयांवर चर्चा झाली़ संत जसवंत स्वामी यांच्या ज्ञानापासून प्रभावित होऊन, त्यांना तुलसीदास यांनी धातूची दोन फूटांची हनुमानाची प्रासादिक मूर्ती भेट म्हणून दिली़ ही मूर्ती कुंकरमुंडा येथील राममंदिर संस्थानात आजही जशीच्या तशी आह़े काळ्या पाषाणातील रामाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होणारी ही मूर्ती भाविकांना अनेक मार्गातून वाट दाखवणारी असल्याची धारणा येथील भाविकांची आह़े गुजरात राज्यातील भाविकांसह महाराष्ट्रातील भाविक राम मंदिरात दर्शनासाठी जातात़
कुकरमुंडा येथील ज्येष्ठ नागरिक उमेश शहा यांच्यासोबत यावेळी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, हनुमान जयंतीपेक्षा रामनवमीला याठिकाणी मोठा कार्यक्रम होतो़ रात्रभर तुलसीदासांची विविध पदे गायली जातात़ या पदांच्या दरम्यान लंकादहनाचा सजीव आरास सादर केला जातो़ संस्थानातील जांभळाच्या झाडाला चिंध्या बांधून हनुमानाचा वेश धारण करणा:याकडून हे झाड पेटवत असल्याचा देखावा अनुभवण्यासाठी दोन्ही राज्यातील शेकडो भाविक याठिकाणी दाखल होतात़
मूर्तीबाबत अनेक अख्यायिका प्रसिद्ध
कुकरमुंडा येथील राममंदिरातील हनुमान मूर्तीबाबत एक अख्यायिका प्रसिद्ध आह़े ही अख्यायिका म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वी कुकरमुंडा गावालगत वाहणा:या तापीनदीला मोठा पूर आला होता़ या पुराचे पाणी गावार्पयत आले होत़े हे पाणी कमी व्हावे म्हणून, नदीकाठावर हनुमानाची मूर्ती ठेवण्या आली़ ही मूर्ती रात्रभर याठिकाणी ठेवल्यानंतर पाणी कमी झाल़े काही दिवसांनी मात्र मूर्तीच्या बेंबीतून पाणी पाझरत असल्याचे दिसून आल़े अनेक वर्ष हे पाणी असेच निघत असल्याचे सांगितले जात़े
कुकरमुंडा येथील खंडोजी महाराज संस्थानाचे गादीपती ह़भ़प उद्धव महाराज यांना याबाब माहिती विचारली असता, त्यांनी सांगितले की, हा एक अनोखा ठेवा आह़े संत जसवंत स्वामी यांच्या भक्ती आणि ज्ञानाला साद देत तुलसीदासांनी ही भेट दिली होती़ यामुळे दोन प्रांतातील नाते अधिक बळकट झाले होत़े