धुळे जिल्ह्यात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
By अतुल जोशी | Published: August 30, 2023 05:42 PM2023-08-30T17:42:42+5:302023-08-30T17:42:58+5:30
नागेश्वर बंगला येथील विजय ओंकार जाधव (वय ३५) यांनी २९ रेजी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
धुळे : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडली. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. धर्मीबाई एकनाथ पवार (वय २८, रा. मंडाणे, ता. साक्री) व विजय ओंकार जाधव (वय ३५, रा. नागेश्वर बंगला, ता. शिरपूर) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
मंडाणे येथे महिलेची आत्महत्या
साक्री तालुक्यातील मंडाणे येथील धर्मीबाई एकनाथ पवार हिने मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतला. तिला सरपंच भीमराव सुरेश पवार, सोमनाथ वसंत पवार, बुधाजी वारू गवळी, श्रीराम महारू पवार, हरिश्चंद्र तापाजी पवार यांनी खाली उतरवून पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॅाक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक बी.जी. शेवाळे करीत आहेत.
नागेश्वर बंगला येथे तरुणाची आत्महत्या
नागेश्वर बंगला येथील विजय ओंकार जाधव (वय ३५) यांनी २९ रेजी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे चुलतभाऊ अनार भीमा जाधव यांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. स्वाती राजपूत यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत थाळनेर पोलिसात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक रामोळे करीत आहेत.