दोन दिवशीय राष्ट्रीय परिषद संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:27 PM2018-12-16T17:27:43+5:302018-12-16T17:28:12+5:30
शिरपूर : परिषदेत एकूण ३० रिसर्च पेपर्सचे वाचन
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा संगणक शास्त्र विभाग व यु.जी.सी. नवी दिल्ली प्रायोजित अॅडवान्सड् ट्रेंडस् अॅण्ड चॅलेंजेस इन कॉम्प्युटर सायन्स या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.
येथील पटेल आॅडीटोरीयम हॉलमध्ये राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आर.सी.पटेल संस्थेचे चेअरमन राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी गुलबर्गा विद्यापीठ बंगळूरु येथील डॉ़पी.एस. हिरेमठ, उ.म.वि. संगणक विभागाचे डायरेक्टर डॉ.बी.व्ही.पवार, प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील आदी उपस्थित होते़ राजगोपाल भंडारी यांनी विद्यार्थ्यांनी शिकत असतांनाच संगणक शास्त्रातील अधिकाधिक नवनवीन विषय आत्मसात करणे आवश्यक आहे असे सांगितले. डॉ.बी.वी.पवार यांनी विद्यापीठाचा अभ्यासक्रम इंडस्ट्रीशी निगडीत असावा याबाबत माहिती दिली. डॉ.पी.एस. हिरेमठ यांनी विद्यार्थी व शिक्षकांनी नेहमीच अपडेट राहायला पाहिजे यावर भर दिला. त्यांनी इंडस्ट्री ४.० व रेट ग्रोथ या विषयावर आपले महत्वपूर्ण व्याख्यान दिले.
डॉ.ए.ए.देसाई यांनी मशीन लर्निंग टेक्निक्स व अॅप्लीकेशन्स या विषयावर अतिशय उपयुक्त व्याख्यान दिले. यानंतर सहभागी प्राध्यापकांनी आपले रिसर्च पेपर्सचे वाचन केले. डॉ.बी.व्ही.पवार यांनी संशोधन कसे करावे या विषयावर माहितीपर व्याख्यान दिले व सर्व सहभागींना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या दोन दिवसांच्या परिषदेत एकूण ३० रिसर्च पेपर्सचे वाचन करण्यात आले. सदर परिषदेस एकूण ११० शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला़ परिषदेचे समन्वयक प्रा.बी.एस.पंचभाई यांनी प्रास्तविक केले तर सुत्रसंचालन परिषदेचे सचिव प्रा.आनंद माहेश्वरी व प्रा.माधवी गुल्हाने यांनी केले.
दोन दिवसीय परिषदेच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ.ए.जी.सोनवणे, प्रा.सुनिल मोने, प्रा.बी.एस पंचभाई प्रा. आनंद माहेश्वरी, प्रा.दिपक चव्हाण, गणेश सोनार, बन्सीलाल चौधरी, योगेश कुलथे, अनिस बेग, डॉ.अरुण पाटील, प्रा.गोपाल भिडे, प्रा.राहुल माळी, प्रा.राम सूर्यवंशी, प्रा.सपना ईशी, प्रा.रुचिता अग्रवाल, प्रा.माधवी शिरसाठ, प्रा.संदीप पाटील, प्रा.मयुरी राजपूत, प्रा.कविता माळी, प्रा.मेघा सोनवणे, प्रा.कोमल पाटील, प्रा.रुपाली अग्रवाल, गणेश सोनार, संजय मोरे, मेहुल गुजराथी, संदेश राजपूत यांनी सहकार्य केले.